कोल्हापूर - नॅशनल हेराल्ड कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते सध्या आक्रमक झाले असून राज्यात काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी केंद्र सरकार आणि ईडी विरोधात आंदोलन व निदर्शने केली जात आहेत. दरम्यान कोल्हापुरात आज ( शुक्रवारी ) काँग्रेसच्या वतीने पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर ( Congress agitation in front of the statue of Mahatma Gandhi kolhapur ) धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकार ( Modi government ) विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपकडून लोकशाही धोक्यात आणली जात असून राजकीय वैमनस्यातून सूडबुद्धीने ही कारवाई सुरू आहे, असा आरोप गृहराज्यमंत्री सतेज पाटील ( Minister Satej Patil ) यांनी केला आहे.
एका बाजूला काँग्रेसकडून भारत जोडो अभियान सुरू असताना याची धास्ती घेऊन भाजपा ईडीच्या माध्यमातून काँग्रेस तोडो करण्याचे काम करत आहे. तपास यंत्रणा ही भाजपाच्या दबावाखाली काम करत आहे. लोकशाही असलेल्या भारत देशात भाजपा हुकूमशाही आणण्याचे काम करत आहे. अशी टीका सतेज पाटलांनी केली आहे.
काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण? : नॅशनल हेराल्ड प्रकरण 2012 मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला की काही काँग्रेस नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड यंग इंडियन लिमिटेड मार्फत विकत घेतले. दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसच्या 2000 कोटी रुपयांच्या इमारतीवर कब्जा करण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप स्वामी यांनी केला होता. कटाच्या अंतर्गत यंग इंडियन लिमिटेडलाच्या मालमत्तेचा अधिकार देण्यात आला आहे.
राहुल आणि सोनिया गांधी 2015 पासून जामीनवर : सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांना या प्रकरणी लवकर सुनावणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले होते. 19 डिसेंबर 2015 रोजी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ट्रायल कोर्टाने जामीन मंजूर केला होता. 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने खटला रद्द करण्यास नकार दिला आणि सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस आणि सुमन दुबे यांना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट दिली.
हेही वाचा - Satej Patil Vidhan Parishd : सर्व काही आलबेल आहे असे भाजपने समजू नये : गृहराज्यमंत्री सतेज पाटील