ETV Bharat / city

Chandrakant Patil On Mahavikas Aghadi : "शेतकऱ्यांच्या पोरांना दारूच्या नादी लावायचे आहे का?" - चंद्रकांत पाटील प्रा. एन. डी. पाटील

राज्य सरकारने गुरुवारी सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली ( Chandrakant Patil On Mahavikas Aghadi ) आहे. शेतकऱ्यांच्या पोरांना दारूच्या नादी लावायचे आहे का, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला ( Chandrakant Patil Critisized Mahavikas Aghadi ) आहे.

Chandrakant Patil
Chandrakant Patil
author img

By

Published : Jan 28, 2022, 1:44 PM IST

कोल्हापूर - राज्य सरकारने वाईन विक्रीस परवानगी दिल्यानंतर विरोधी पक्षाकडून सडकून टीका केली जात ( Opposition Critisized Mahavikas Aghadi Government ) आहे. त्याला प्रत्युत्तर देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वाईन विक्री च्या निर्णयाला विरोध करणारे शेतकरी विरोधी आहेत, असे म्हटले होते. त्यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली ( Chandrakant Patil On Wine Selling ) आहे. शेतकऱ्यांचे नाव पुढे करून किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देत आहात. शेतकऱ्यांच्या पोरांना दारूच्या नादी लावायचे आहे का, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

कोल्हापूरात प्रसारमाध्यमांनी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या पिकांना आणि फळांना पहिला भाव द्या मग इतर विचार करा. आजपर्यंत शेतकऱ्यांचे अतिवृष्टी गारपीटने झालेल्या नुकसानीची भरपाई दिली नाही तसेच कर्जमाफी सुद्धा अर्धवट ठेवली. हे सगळं राहील बाजूला आणि तुम्ही शेतकऱ्यांचे नाव पुढे करून किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देत आहात. शिवाय शेतकऱ्यांच्या पोरांना दारूच्या नादी लावायचे आहे का,"असेही पाटील यांनी म्हटलं.

चंद्रकांत पाटील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

प्रा. एन. डी. पाटील यांच्यासारखे नेतृत्वच होणे नाही

चंद्रकांत पाटील यांनी प्रा. एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील उर्फ माई यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवाय अनेक आंदोलनासंदर्भात सुद्धा बराच वेळ चर्चा चालायची याचा उल्लेख करत प्रा. एन. डी. पाटील यांच्यासारखे नेतृत्वच होणे नाही, अशी प्रतिक्रिया पाटील ( Chandrakant Patil On Nd Patil ) यांनी दिली आहे.

तुम्ही आता घटना सुद्धा मानत नाही

12 आमदारांच्या नियुक्तीबाबत संजय राऊत यांनी केलेल्या प्रश्नाबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यपाल हे राज्याचे सर्वोच्च पद आहे. त्यांनी मुद्दाम नियुक्ती थांबवली नाही. त्यांच्याकडे अधिकार असतात. तुम्हीच आता घटना मानत नाही आहात. राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री तसेच न्यायाधीशांना सुद्धा राज्यपाल शपथ देत असतात संजय राऊत आपण देत नाही असे म्हणत आपण त्यांना मान देत नाही, असेही पाटील यांनी ( Chandrakant Patil On Sanjay Raut ) सांगितले.

हेही वाचा - Supreme Court On Bjp Mla Suspension : सर्वोच्च न्यायालयाकडून भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.