ETV Bharat / city

Chandrakant Patil Slammed Sanjay Raut : संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे नाहीत, तर शरद पवारांचे आहेत - चंद्रकांत पाटील - Sanjay Raut Sharad Pawar visit

आयएनएस विक्रांत ( INS Vikrant corruption ) प्रकरणाबाबत भाजप नेते किरीट सोमैय्या ( BJP leader Kirit Somaiya ) यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत बोलताना चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil slammed Sanjay Raut ) पुढे म्हणाले, माझ्यासहित ज्यांनी ज्यांनी चूक केली असेल त्यांना शासन होईल. आम्ही ज्याप्रमाणे न्याय नाही मिळाला तर कोर्टात जातो. तसे आमच्या विरोधात कोर्टात जा.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Apr 7, 2022, 5:32 PM IST

Updated : Apr 7, 2022, 5:44 PM IST

कोल्हापूर - संजय राऊत अडचणीत आल्यानंतर लगेचच शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मात्र याच महाविकास आघाडीमधील आणि आपल्याच पक्षातील नेते अडचणीत आल्यानंतर त्यांनी भेट घेतली नाही. त्यामुळे संजय राऊत हे शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरे यांचे नाहीत. तर पवार यांचेच आहेत, हे या घटनेवरून लक्षात येते असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

न्यायालयात जावे- आयएनएस विक्रांत ( INS Vikrant corruption ) प्रकरणाबाबत भाजप नेते किरीट सोमैय्या ( BJP leader Kirit Somaiya ) यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत बोलताना चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil slammed Sanjay Raut ) पुढे म्हणाले, माझ्यासहित ज्यांनी ज्यांनी चूक केली असेल त्यांना शासन होईल. आम्ही ज्याप्रमाणे न्याय नाही मिळाला तर कोर्टात जातो. तसे आमच्या विरोधात कोर्टात जा. आम्हाला काही हरकत नाही. चूक असेल तर शिक्षा भोगायला तयार आहोत, असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांच्यावर कारवाई आल्यानंतर दिल्लीहून आज पहिल्यांदाच मुंबईमध्ये येत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत स्वागत केले जाणार आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील राऊत यांना टोला लगावला. ते काय योद्धा आहेत का? कोणती लढाई लढून आलेत की युक्रेनवरून आले? असेही ते म्हणाले.

संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे नाहीत,

पृथ्वीराज चव्हाण बातम्या वाचत नाहीत वाटतं- ईडीच्या कारवाई इतक्या झाल्या आहेत. पण एकही आरोप अंतिम टप्प्यापर्यंत गेलेला नाही. लोकांना शरण आणण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. हे अतिशय गंभीर असून हे कुठेतरी थांबले पाहिजे. भाजप चौकशी यंत्रणांचा वापर करत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप माजी।मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केला. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मध्येमध्ये पेपर वाचत नाहीत, असे दिसते. अनेकांवर कारवाया झाल्या आहेत. टप्प्याटप्प्याने हे सगळे पुढे जात असते. न्यायालयात गोष्टी असतात. त्यामुळे न्यायाधीशांना कमी लेखण्याचे काही काम नाही.

हेही वाचा-Chandrashekhar Bawankule : राज्य सरकार ओबीसी समाजाच्या विरोधात षडयंत्र करत आहे- चंद्रशेखर बावनकुळे

हेही वाचा-आमदार निधीवाटप वाद : अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादीचे आमदारही नाराज

हेही वाचा-ED कारवाईनंतर संजय राऊत मुंबईत दाखल; सेना कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

Last Updated : Apr 7, 2022, 5:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.