ETV Bharat / city

कोल्हापूर विधानपरिषद : दिग्गज नेते आमच्यासोबत असल्याने विजय सुकर - चंद्रकांत पाटील - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक आम्हाला अवघड नाही. सद्या आमच्याकडे 165 जण आहेत आणि गरजेची असणारी 43 मते मिळवणे काही अवघड नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP State President Chandrakant Patil) यांनी म्हटले आहे.

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Nov 22, 2021, 10:28 PM IST

कोल्हापूर - गतवेळच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महादेवराव महाडिक यांचा जेवढ्या मतांनी पराभव झाला, त्यापैकी कोरे आणि आवाडे हे दोन नेते यावेळी आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आम्हाला ही निवडणूक अवघड नाही. सद्या आमच्याकडे 165 जण आहेत आणि गरजेची असणारी 43 मते मिळवणे काही अवघड नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP State President Chandrakant Patil) यांनी म्हटले. शिवाय अमल महाडिक(Amal Mahadik) यांचा विजय निश्चित आहे, असा दावासुद्धा त्यांनी यावेळी केला. कोल्हापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील - प्रदेशाध्यक्ष, भाजप
  • ...तर जिल्ह्याचे राजकारण वेगळे असते :

कोल्हापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले, गतवेळच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्तीचे नेते आमदार विनय कोरे आणि इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवडे हे सतेज पाटील यांच्यासोबत होते. मात्र यावेळी हे दोन्ही आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आमच्यासाठी ही जमेची बाजू आहे. जर गेल्यावेळीच हे दोघे अमच्यासोबत असते तर या जिल्ह्याचे चित्रच वेगळे असते, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यामुळे ही निवडणूक आमच्यासाठी अधिक सुकर झाली असल्याचेही त्यांनी म्हंटले.

  • अनेक नवीन नगरपालिका तसेच नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व :

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, यावेळी नव्यानेच स्थापन झालेल्या जेवढ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये बहुतांश नगरसेवक हे भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे ही सुद्धा एक जमेची बाजू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.