कोल्हापूर - रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर बोरपाडले घाटात भरधाव कारला अचानक आग लागली. या आगीत कार जळून खाक झाली असून यामध्ये दुर्दैवाने वाहन चालकाचा होरपळून मृत्यू झाला. अभिजित पांडूरंग ठाणेकर (रा. आजरा) असे या चालकाचे नाव आहे.
बर्निंग कारचा थरार -
घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून मलकापूरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकीला अचानक सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली. या आगीत चारचाकी गाडी भस्मसात झाली असून चालकाचा सुद्धा होरपळून मृत्यू झाला. शॉर्ट सर्कीटमुळे गाडीत आग लागलेची माहिती मिळाली. स्थानिकांसह कोल्हापूर महानगरपालिका अग्निशामक विभागाने या गाडीला लागलेली आग विझवली. मात्र याला खूपच उशीर झाला होता. यावेळी महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी होती. घटनास्थळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांनी पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा - आश्चर्यम..! देवास येथील 90 वर्षीय आजी चालवते कार, गैजेट्सचीही आवड, पाहा व्हिडिओ...