कोल्हापूर - कोल्हापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. रोजच 500 ते 1 हजार नवे रुग्ण आढळत आहेत. आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचासुद्धा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. स्वतः मंत्री मुश्रीफ यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. शिवाय आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वतःची काळजी घेऊन चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
-
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी.लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे.
— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) September 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
हसन मुश्रीफ
">माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी.लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे.
— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) September 18, 2020
हसन मुश्रीफमाझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी.लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे.
— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) September 18, 2020
हसन मुश्रीफ
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 6 आमदारांना आणि दोन खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात एकूण 3 मंत्री आहेत. त्यातील मुश्रीफ यांना कोरोनाची लागण झाली असून, सर्वांनी आपली काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शिवाय आपली तब्येत एकदम उत्तम असून, लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन, असेही हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - बनवा बनवी : 9 लाखांच्या बिलावर रुग्णालयाकडून 1 रुपया डिस्काऊंट
दरम्यान, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38 हजारांवर पोहोचली आहे. तर, 1 हजार 162 जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. जवळपास 26 हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात 12 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.