कोल्हापूर - लॉकडाऊनकाळातील वीज बिल माफ करावीत, यामागणीसाठी आज भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कोल्हापूरकरांनी अचानक रास्तारोको करून महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सरकारने वीज बिल माफी करावी अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराच भाजपने दिला आहे. दरम्यान यावेळी आंदोलन कर्ते व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली.
वीज बिल माफ करा, अन्यथा सरकारला कोल्हापुरी हिसका दाखवू - सरकारला कोल्हापुरी हिसका
लॉकडाऊन काळातील वीजबिल माफी करावी या मागणीसाठी भाजपकडून आज राज्यभरात आंदोलन सुरू आहेत. कोल्हापुरात देखील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर भाजपच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज बिल माफी वरुन सरकारला कोल्हापुरी हिसका दाखवण्याचा इशारा भाजपने दिला आहे.
![वीज बिल माफ करा, अन्यथा सरकारला कोल्हापुरी हिसका दाखवू सरकारला कोल्हापुरी हिसका दाखवू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9635778-419-9635778-1606125171826.jpg?imwidth=3840)
सरकारला कोल्हापुरी हिसका दाखवू
कोल्हापूर - लॉकडाऊनकाळातील वीज बिल माफ करावीत, यामागणीसाठी आज भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कोल्हापूरकरांनी अचानक रास्तारोको करून महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सरकारने वीज बिल माफी करावी अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराच भाजपने दिला आहे. दरम्यान यावेळी आंदोलन कर्ते व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली.
Last Updated : Nov 23, 2020, 4:20 PM IST