कोल्हापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदान आज सकाळपासून सुरू झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. राज्यातल्या विधानपरिषदेच्या सर्वच जागांवर भाजपचा विजय होईल, असा विश्वाससुद्धा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी येथील महाराष्ट्र हायस्कूल मधील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा -धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
हेही वाचा -कोल्हापूरात मतदानाला सुरुवात; जिल्ह्यात 281 मतदान केंद्र