ETV Bharat / city

Uddhav Thackeray Birthday : कोल्हापुरात शिवसैनिकांकडून भव्य बाइक रॅलीचे आयोजन करत शक्ती प्रदर्शन

author img

By

Published : Jul 27, 2022, 4:53 PM IST

Updated : Jul 27, 2022, 5:02 PM IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यामुळे कट्टर शिवसैनिकानी पक्षप्रमुखांचा हा वाढदिवस मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरी करत असून कोल्हापूर शहरात ( Bike rally of Shiv Sainiks in Kolhapur city ) सकाळपासूनच शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. दसरा चौकातून बाईक रॅली काढण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले असून आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत अशा प्रकारचे फलकही हातात घेण्यात आले होते.

बाईक रॅली
बाईक रॅली

कोल्हापूर - शिवसेनेत एकनाथ शिंदे बंड करत तब्बल 40 आमदार काही खासदारांना आपल्यासोबत घेऊन गेल्याने शिवसेनेत मोठी दरी निर्माण झाली आहे. याचाच परिणाम आता स्थानिक पातळीवरही दिसत असून सर्वत्र शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगत आहे. या बंडा नंतर आज ( बुधवारी ) प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यामुळे कट्टर शिवसैनिकानी पक्षप्रमुखांचा हा वाढदिवस मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरी करत असून कोल्हापूर शहरात ( Bike rally of Shiv Sainiks in Kolhapur city ) सकाळपासूनच शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. दसरा चौकातून बाईक रॅली काढण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले असून आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत अशा प्रकारचे फलकही हातात घेण्यात आले होते.

प्रतिक्रिया देताना शिवसैनिक

संजय मंडलिकांवर जोरदार टीका : पक्षात बंड झाल्यानंतर शिंदे गटात कोल्हापुरातील दोन आमदारांचा सहभाग होता. ज्यामध्ये आमदार प्रकाश आबिटकर आणि राजेंद्र पाटील यड्रावकर हे गेले होते. सोबतच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हेही एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाल्याने कोल्हापुरातील निष्ठावंत आणि आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी निष्ठा यात्रा काढली होती. यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांसह खासदार संजय मंडलिक हे देखील सहभागी झाले होते. मात्र यानंतर काही दिवसातच तेही एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाल्याने यावेळी मात्र या बाईक रॅलीमध्ये ते दिसून आले नाही. यामुळे शिवसैनिकांकडून व पदाधिकाऱ्यांवरून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

हेही वाचा - Shivajirao Adhalarao Patil : शिंदे गटातील आढळराव-पाटलांकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा; मुख्यमंत्र्यांना बॅनरवर टाळलं

Last Updated : Jul 27, 2022, 5:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.