कोल्हापूर - पंचगंगा नदीच्या प्रदूषणात ( Panchganga pollution issue ) मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पंचगंगा नदी ही आता गटार गंगा झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शिये पुल ते बापट कॅम्प या भागात नदी पात्रात मेलेल्या माशांचा खच ( fishes death in Panchganga ) पाहायला मिळत आहे.
पंचगंगा नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने मासे मृत्युमुखी पडलेले आहेत. माशांना ऑक्सिजन न मिळाल्याने मासे अक्षरश: तडफडून ( fishes death in Pnachganga ) मरत आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे काहीही लक्ष नाही. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray visit Kolhapur ) हे गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वीच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. तेव्हा पंचगंगा नदी प्रदूषणावर केवळ चर्चा झाली. मात्र, अजून 72 तास उलटल्यानंतर पुन्हा नदीत हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे परिसरातदेखील मोठी दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांच्या आरोग्याला धोका-
पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा हा खूप वर्षापासून प्रलंबित आहे. कारखान्यातून येणारे रसायनयुक्त पाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडणे, शहरातील ड्रेनेज, गटारचे पाणी नदीत सोडणे, म्हशी धुणे यामुळे नदी मोठ्या प्रमाणात दूषित झाली आहे. कोल्हापुरातील अनेक पर्यावरण प्रेमी पंचगंगा बचाव म्हणत लढा उभा करत आहेत. असे असले तरी दुसऱ्या बाजुला प्रदूषण नियत्रंण मंडळ विभाग झोपलेले आहे का, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला होत आहे. मृत्युमुखी पडलेल्या माशांची पाहणी करण्याकरिता अद्याप कोणताही अधिकारी आला नाही. येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
हेही वाचा-Nawab Malik : मलिकांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी आक्रमक; कप्तान मलिक यांनाही ED चे समन्स