कोल्पंहापूर - पंचगंगेच्या पाणी पातळीत संथ गतीने घट होत आहे. पंचगंगा नदी धोका पातळीच्या खालून वाहत आहे. संध्या पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ४२ फुट ११ इंच आहे. ही गोष्ट कोल्हापूरच्या नागरिकांना दिलासा देणारी आहे. मात्र, शिरोळ परिसरात अद्यापही महापूराने 22 गावे वेडलेली आहेत. लष्कर, एनडीआरएफचे मदतकार्य जलद गतीने सुरू आहे.
शहरातील पाणी ओसरल्याने एसटी सेवा सुरळीत सुरु झाली आहे. तर, रुकडी परिसरात रेल्वे रुळाची डागडुजी सुरू आहे. शुक्रवारपर्यंत कोल्हापूरची रेल्वे सेवा सुरळीत होणार असल्याची माहिती मिळत आहे. कोल्हापूर-सांगली वाहतूक सुरू करण्यात आली आहे. शहरात आणि ग्रामीण भागात घरोघरी आरोग्य सर्वेक्षण सुरु आहे. निम्म्या शहराचे पाणी अजून 15 दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. पुरग्रस्थांना सरकारी मदत वाटपाला सुरूवात झाल्याची माहिती मिळत आहे.