ETV Bharat / city

ETV Bharat Impact : अखेर कोल्हापुरात होणार 'राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा' - कोल्हापूरच्या खासबाग मैदानात कुस्ती

कोल्हापूरच्या खासबाग मैदानात ( National Wrestling Championship at Khasbagh Ground Kolhapur ) यावर्षी नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील 'मातीतील कुस्ती स्पर्धां'चे आयोजन करण्यात येणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती ( MP Sambhaji Raje Chhatrapati ) व भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह ( MP Brijbhushan Sharan Singh ) यांच्यामध्ये आज (सोमवारी) झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.

ETV Bharat Impact
ETV Bharat Impact
author img

By

Published : Apr 25, 2022, 7:35 PM IST

कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूरच्या खासबाग मैदानात ( National Wrestling Championship at Khasbagh Ground Kolhapur ) यावर्षी नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील 'मातीतील कुस्ती स्पर्धां'चे आयोजन करण्यात येणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती ( MP Sambhaji Raje Chhatrapati ) व भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह ( MP Brijbhushan Sharan Singh ) यांच्यामध्ये आज (सोमवारी) झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. या संदर्भातील बातमी 'ईटीव्ही भारत'ने ( ETV Bharat Impact ) सुद्धा प्रसिद्ध केली होती. ज्यात कोल्हापुरात अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र तसेच अनेक कुस्त्यांच्या स्पर्धांचे आयोजन करण्याची गरज असल्याबाबत सविस्तर आढावा घेतला होता. त्यानंतर आता खासबाग मैदानात राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा घेणार असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे.

खासदार बृजभूषण शरण सिंह आणि संभाजीराजेंमध्ये चर्चा : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बृजभूषण यांची भेट घेऊन राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी कुस्तीसाठी दिलेले योगदान याबद्दल त्यांना माहिती दिली होती. तसेच कुस्ती या क्रीडा प्रकारच्या उद्धारासाठी महाराजांनी जे उत्तुंग कार्य केले आहे. त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षात कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानात राष्ट्रीय स्तरावरील मातीतील कुस्ती स्पर्धा भरवावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी त्यांच्याकडे केली. त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली. आज दिल्ली येथे झालेल्या बैठकीत नोव्हेंबर महिन्यात आपण खासबाग मैदान कोल्हापूर येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करू, अशी ग्वाही खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी संभाजीराजे यांना दिली.

300 हुन अधिक मल्ल स्पर्धेत सहभागी होणार : संभाजीराजेंनी दिलेल्या माहितीनुसार पुरुष व महिला अशा दोन्ही विभागांच्या या स्पर्धा असणार असून देशभरातील नामांकित असे 300 हून अधिक मल्ल या स्पर्धेत सहभागी होतील, असे संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले. याबाबत पुढील नियोजन करण्यासाठी संभाजीराजे यांच्या पुढाकारातून कोल्हापूर जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी व राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे सचिव यांची संयुक्त बैठक येत्या 2 मे रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

फक्त कुस्ती शिकून उपयोग नाही, अनेक स्पर्धांचे आयोजन करणे गरजेचे : मागील आठवड्यात 'ईटीव्ही भारत'ने दिलेल्या बातमीत म्हटले होते की, एकेकाळी कोल्हापुरातील खासबाग मैदानात दर शनिवारी भव्य असे कुस्त्यांचे मैदान भरायचे. लोक तिकीट काढून या ठिकाणी कुस्ती पाहण्यासाठी गर्दी करायचे. त्यावेळी कुस्तीला केवळ राजाश्रय नव्हता, तर लोकाश्रय सुद्धा होता. त्यामुळेच कोल्हापूरच्या मल्लांचा देशभरात एक वेगळा दबदबा होता. हेच दिवस जर परत बघायचे असतील, तर नेहमी कुस्त्यांच्या स्पर्धा घेण्याची गरज आहे. केवळ अभ्यास करायचा आणि परीक्षाच जर होत नसेल, तर त्या अभ्यासाचा काय उपयोग अशी परिस्थिती विद्यार्थ्यांची होते, तशीच परिस्थिती पैलवानांची आहे. अनेक मोठ्या कुस्त्यांची मैदाने येथे भरविली पाहिजे. मग ती प्रशासनाकडून असुदेत किंव्हा जिल्ह्यातील अनेक कारखाने आणि सहकारी संस्था आणि अनेक नेते मंडळी आहेत. त्यांच्या मार्फत या गोष्टी शक्य होऊ शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा तो राजाश्रय आणि लोकाश्रय पैलवानांना मिळेल. एवढेच नाही तर वारंवार स्पर्धांचे आयोजन झाल्याने पैलवांना स्वतः कशामध्ये आपण कमी पडत आहोत, याचा अभ्यास होतो. त्यामुळे हे बदल होणे आवश्यक असल्याचेही यामध्ये मांडले होते. शिवाय खासबाग मैदानाच्या दुरावस्थेबाबत सुद्धा आढावा घेतला होता.

हेही वाचा - Kolhapur Wrestlers : कोल्हापूरच्या कुस्तीपटूंना अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राची गरज - कुस्ती प्रशिक्षक कृष्णात पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.