ETV Bharat / city

15 दिवसांच्या विश्रांती नंतर कोल्हापुरात पुन्हा पावसाचा जोर; राजाराम बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली - heavy rains kolhapur

कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा दिवसानंतर पुन्हा पावसाची ( Heavy rains again in Kolhapur ) जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे.

heavy rains again in Kolhapur
कोल्हापूर जोरदार पाऊस
author img

By

Published : Aug 7, 2022, 11:35 AM IST

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा दिवसानंतर पुन्हा पावसाची ( Heavy rains again in Kolhapur ) जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील राजाराम बंधारा हा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेल्या आहे. यामुळे यावरील वाहतूक आता बंद करण्यात आली आहे.

कोल्हापुरात पुन्हा पावसाचा जोर

हेही वाचा - ACB Trap on Police Naik : 1 कोटीची लाच मागणाऱ्या पोलीस नाईकावर गुन्हा दाखल

जिल्ह्यातील गगनबावडा, शाहूवाडी, भुदरगड या तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. पंचगंगेची पाणी पातळी ही सध्या 19 फुटावर असून आज सकाळपासून पावसाचा जोर हा काही अंशी कमी झाला आहे. मात्र, हवामान खात्याकडून 9 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पाऊस राहणार असल्याचा इशारा देण्यात आला असल्याने येत्या काळात पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे यंत्रणाही सतर्क झाल्या असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आपत्ती आल्यास त्याचा सामना करण्यासाठी तयारी सुरू आहे. दरम्यान राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून आज सकाळी सात वाजेपर्यंत धरण 78 टक्के भरले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने सुट्टी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, पावसाने पुन्हा जोर धरल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा - Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करा - आ. सतेज पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.