ETV Bharat / city

Aditya Thackeray In Kolhapur :..तर पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल - आदित्य ठाकरे - कोल्हापूर माझी वसूंधरा कार्यक्रम

माझी वसुंधरा अभियान 2.0मध्ये ( Mazi Vasundhara 2.0 ) पुणे विभागाचे काम खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे. याच पद्धतीने सर्वांनी चांगले काम केल्यास पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल, असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) यांनी आज व्यक्त केला.

Aditya Thackeray In Kolhapur
Aditya Thackeray In Kolhapur
author img

By

Published : Feb 21, 2022, 8:44 PM IST

कोल्हापूर - माझी वसुंधरा अभियान 2.0मध्ये ( Mazi Vasundara 2.0 ) पुणे विभागाचे काम खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे. याच पद्धतीने सर्वांनी चांगले काम केल्यास पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल, असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) यांनी आज व्यक्त केला. माझी वसुंधरा अभियानाबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे महसूल विभागाची बैठक कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतही ( Uday Samant ) उपस्थित होते.

प्रतिक्रिया

'अभियान लोकचळवळ होईल असे काम करा' -

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण याबाबत बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, "माझी वसुंधरा अभियान" राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. पर्यावरण रक्षणासाठी या अभियानांतर्गत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करावे. या अभियानाची मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून यात जनसहभाग व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा. या अभियानात शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, तरुण, वयस्कर अशा सर्व वयोगटातील व्यक्तींना सहभागी करुन घ्यावे, जेणेकरुन हे अभियान लोकचळवळ होईल. हे अभियान लोकप्रिय मोहीम होत आहे. पर्यावरण रक्षणाच्या कामात प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे. पर्यावरण रक्षण व प्रदूषण नियंत्रण यासाठी विभागीय स्तरावर समिती नियुक्त करावी. तसेच याविषयीच्या आवश्यक त्या सूचना राज्य शासनाला सादर कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

विविध बाबींवर चर्चा -

यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी या अभियानांतर्गत शहर व जिल्ह्यात केलेल्या व करण्यात येणाऱ्या कामाची माहिती दिली. यावेळी सौर ऊर्जा, सौरपंपाचा वापर, बायोगॅस प्लॅन्ट, फुलपाखरु उद्यान, बागबगीचा सुशोभीकरण, जलपर्णीवर उपाययोजना, नदी स्वच्छता व सार्वजनिक ठिकाणची साफसफाई, जल व हवा प्रदूषण नियंत्रण आदी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

हेही वाचा - Chandrakant Patil On Sanjay Raut : 'संजय राऊत यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.