ETV Bharat / city

Rajesh Kshirsagar : कोल्हापूर उत्तरसाठी तिकीट मिळालेच पाहिजे; राजेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते आक्रमक

author img

By

Published : Mar 21, 2022, 12:56 PM IST

Updated : Mar 21, 2022, 2:58 PM IST

कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर ( Rajesh Kshirsagar ) यांना डावलले गेल्याने, आक्रमक झालेले कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून समर्थन करत आहेत. कोल्हापूर उत्तरसाठी तिकीट मिळालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत आहेत.

Rajesh Kshirsagar
Rajesh Kshirsagar

कोल्हापूर - तब्बल दोन दिवस नॉटरिचेबल असणारे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर ( Rajesh Kshrisagar ) यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपली अस्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकित हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानंतर राजेश क्षीरसागर हे नाराज होते. तसेच गेली 2 दिवस ते नॉट रीचेबल होते. मात्र, त्यांनी आज माध्यमांसमोर येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करत मातोश्री आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असल्याचं सांगत त्यांनी या पोटनिवडणुकीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आपल्यासाठी प्रमाण आहे. मी काल ही शिवसैनिक होतो. आज ही आहे आणि उद्या ही राहिल, असे म्हटले आहे. तसेच 2024 साली कोल्हापूर उत्तर हा मतदार संघ काँग्रेसकडे नसून शिवसेनेकडे असेल आपण त्यावेळी लढू असेही त्यांनी म्हटले.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

२ दिवस होते नॉट रीचेबल -

सध्या कोल्हापुरात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. काँग्रेसचे कोल्हापूर उत्तर मतदार संघाचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने ही जागा रिकामी झाली होती. या नंतर येथे आता पोट निवडणूक जाहीर झाली आहे. तर या जागेसाठी शिवसेनेचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना तिकीट मिळावे, यासाठी कार्यकर्ते आग्रही होते. कारण कोल्हापूर उत्तर हे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. येथूनच राजेश क्षीरसागर 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, 2019 ला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने आता निवडणूका लागल्या आहेत. राज्यात महविकास आघाडी चे सरकार असल्याने आणि पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हे जागा काँग्रेसला देण्याचे आवाहन केले होते. यामुळे ही जागा काँग्रेसला देण्याचे मुख्यमंत्री जाहीर केले. यामुळे राजेश क्षीरसागर नाराज झाले आणि गेले 2 दिवस ते नॉट रीचेबल होते. मात्र, आज ते कोल्हापुरात दाखल झाले. आक्रमक झालेले कार्यकर्ते आज राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा समर्थन केले. तसेच कोल्हापूर उत्तरसाठी राजेश क्षीरसागर यांना तिकीट मिळालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. यावेळी राजेश क्षीरसागर यांनी एक प्रकारचे शक्ती प्रदर्शन केले आहे.

'२०२४ ला कोल्हापूर उत्तर ही शिवसेनेची असणार' -

कोल्हापूर उत्तरसाठी निवडणूक लागली असून या जागेवर काँग्रेसचे जयश्री जाधव यांचे नाव निश्चित झाले आहे. यामुळे नाराज झालेले राजेश क्षीरसागर यांनी आज शक्ती प्रदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्यात महविकास आघाडीचे सरकार आहे आणि या सरकारचे नेतृत्त्व शिवसेना प्रमुख करत आहेत. यामुळे ते जो आदेश देतील तो आम्हाला मान्य आहे. मी काल ही शिवसैनिक आहे आज ही आहे आणि उद्या ही असणार. मात्र 2024 ला कोल्हापूर उत्तर मध्ये शिवसेना असेल, असा विश्वास ही वव्यक्तकेला आहे तसेच यावेळेस महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसवू यासाठी आता पासूनच कामाला लागा, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहे. तसेच जयश्री जाधव यांच्या प्रचाराला जाणार का विचारले असता त्यांनी शिवसेना प्रमुख जे आदेश देतील ते आम्ही करू, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा- Malik has no bail: 4 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी, नवाब मलिकांचा जेलमधील मुक्काम वाढला,

Last Updated : Mar 21, 2022, 2:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.