ETV Bharat / city

पदवीधरांच्या प्रश्नांशी नेत्यांना काहीही देणे घेणे नाही; मलाच निवडून द्या - अभिजित बिचुकले - abhijit bichukle election

आत्ताच्या नेत्यांना पदवीधरांशी काहीही देणे घेणे नाही. त्यांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. अनेकांना नोकऱ्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी मला 'पदवीधर विकास महामंडळ' स्थापन करायचे आहे. यामध्ये कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता केवळ हुशार पदवीधरांना न्याय दिला जाईल, असे यावेळी अभिजित बिचुकले यांनी म्हटले आहे.

abhijit bichukle
अभिजित बिचुकले
author img

By

Published : Nov 28, 2020, 10:10 AM IST

कोल्हापूर - पदवीधरांना त्यांचे प्रश्न सोडवणारा नेता नाही. आता जे नेते निवडणूक लढवत आहेत ते पक्षाच्या हाताखाली काम करणारे नेते आहेत. पदवीधरांच्या प्रश्नांशी यांना काहीही देणे घेणे नाही, असे पुणे पदवीधर मतदारसंघातील साताऱ्याचे उमेदवार, बिग बॉस मराठी फेम अजिभिज बिचुकले यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या प्रचारार्थ ते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.

अभिजित बिचुकले पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवताहेत..
पदवीधरांसाठी विकास महामंडळ स्थापन करायचे आहे -
आत्ताच्या नेत्यांना पदवीधरांशी काहीही देणे घेणे नाही. त्यांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. अनेकांना नोकऱ्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी मला 'पदवीधर विकास महामंडळ' स्थापन करायचे आहे. यामध्ये कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता केवळ हुशार पदवीधरांना न्याय दिला जाईल, असेही यावेळी अभिजित बिचुकले यांनी म्हटले आहे.
माझ्या विजयासाठी पाठीशी उभे राहा -
मला पदवीधरांचे प्रामाणिकपणे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे सर्वांनी माझ्या विजयासाठी पाठीशी उभे राहा. जर मी माझी दिलेली वचने 1 वर्षातच पूर्ण केली नाहीत तर मी राजीनामा देईन, असेही त्यांनी म्हटले.
या नेत्यांच्या नादाला लागू नका-
पदवीधर मतदार सुशिक्षित आणि अभ्यासू असतात. त्यामुळे तुम्ही या पक्षांच्या राजकारणाला लागू नका. तुम्हाला जो योग्य वाटतो त्याच उमेदवाराला निवडणून द्या. शिवाय माझ्यासारख्या कोणतेही व्यसन नसणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहनसुद्धा बिचुकले यांनी कोल्हापुरात केले.

कोण आहे अभिजित बिचुकले -

अभिजित बिचुकले पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यात राहतात. आजवर प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी त्यांनी बरेचसे स्टंट केले आहेत. अभिजित यांनी आजवर बऱ्याच निवडणुका लढवल्या आहेत. मात्र, दरवेळी अपयश आले आहे. महाराष्ट्राचा २०१९ चा मुख्यमंत्री मीच ठरवणार, या वक्तव्याने देखील ते चर्चेत आले होते. त्याचे बरेचसे बॅनरही लावण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना त्यांनी अनामत रक्कम भरताना चक्क १२ हजार ५०० रुपयांची चिल्लर जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केली होती. अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ते प्रसिद्धी झोतात आले होते.

हेही वाचा- महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती, सरकारने वर्षभरात घेतले 'हे' महत्वाचे निर्णय

हेही वाचा - महाविकास आघाडी सरकार वर्षपूर्ती: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची 'विशेष मुलाखत'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.