ETV Bharat / city

झाडू येतोय...चर्चा तर होणारच! यंदा आम आदमी पार्टी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात - आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

आम आदमी पार्टी आता महाराष्ट्रात पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणूक रणांगणात उतरली आहे. कोल्हापूरसह औरंगाबाद, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या चारही महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी मोठ्या तयारीने उतरणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली आहे.

maharashtra Aam Admi Party
झाडू येतोय...चर्चा तर होणारच! यंदा आम आदमी पार्टी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात
author img

By

Published : Dec 22, 2020, 4:11 PM IST

कोल्हापूर - आम आदमी पार्टी आता महाराष्ट्रात पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणूक रणांगणात उतरली आहे. कोल्हापूरसह औरंगाबाद, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या चारही महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी मोठ्या तयारीने उतरणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली आहे. तसेच यासंबंधी तयारी पूर्ण झाली असून अनंकाची उमेदवारी निश्चित झाल्याचे आपचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी सांगितले. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, 'झाडू येतोय चर्चा तर होणारच' या घोषवाक्याचे अनेक ठिकाणी आता फलक सुद्धा झळकत आहेत.

झाडू येतोय...चर्चा तर होणारच! यंदा आम आदमी पार्टी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात
शिक्षण, पाणी आणि रस्ते यावर सर्वाधिक भर देणार
सध्या राज्यातील चार महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या सर्व महापालिकांच्या निवडणुका आम आदमी पार्टी पूर्ण ताकतीने लढवणार असून त्यासाठी लोकवर्गणी जमा केली जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचूरे यांनी सांगितले. आम आदमी पार्टी प्रामुख्याने शिक्षण, पाणी, आणि रस्ते या प्रश्नांकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दिल्लीतील नेते सुद्धा येणार प्रचाराला
निवडणूक जाहीर झाल्यानंतर दिल्लीतील आम आदमी पार्टीचे नेते देखील महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत. प्रचाराची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक काळात प्रत्येक दिवशी कशा पद्धतीने संपूर्ण यंत्रणा राबवायची याचे आत्तापासून नियोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापुरात सर्व 81 जागांवर उमेदवारी 'आप' निवडणूक लढवणार
कोल्हापुरातील सर्वच 81 जागांवर आम आदमी पार्टी उमेदवार उभे करणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून याची तयारी सुरू होती. नुकतीच महापालिकेची आरक्षण सोडत पार पडली. त्यानुसार सद्या 60 हून अधिक जागांवर पक्षाचे उमेदवार निश्चित करण्यात आले असून त्या सर्वांच्या प्रचाराला देखील लवकरच सुरुवात करणार असल्याचे आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष तसेच प्रचार प्रमुख संदीप देसाई यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.