ETV Bharat / city

Kolhapur North By-Election Voting : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 60.09 टक्के मतदान - भाजप नेते चंद्रकांत पाटील

अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान ( Kolhapur North By-Election Voting ) झाले. सकाळी ७ ते सायंकाळी सहा यादरम्यान ६० टक्के मतदान ( 60 Percent Voting Kolhapur By election ) झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिली.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 60.09 टक्के मतदान

author img

By

Published : Apr 12, 2022, 10:16 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीसाठी ( Kolhapur North By-Election Voting ) आज सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत 357 मतदान केंद्रावर एकूण 60.09 टक्के मतदान ( 60 Percent Voting Kolhapur By election ) झाले. निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, या निवडणुकीसाठी एकूण 15 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये भाजपकडून सत्यजित कदम ( BJP Candidate Satyajeet Kadam ) तर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव ( MVA Candidate Jayashri Jadhav ) रिंगणात होत्या. दोन्ही पक्षांकडून मागील 15 दिवसांपासून जोरदार प्रचार सुरू होता. अनेक दिग्गज नेते कोल्हापूरात प्रचारासाठी आले होते. आज चुरशीने 60.09 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP Leader Chandrakant Patil ) तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील ( Minister Satej Patil ) या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे मतदारराजा कोणाला कौल देणार हे येत्या 16 एप्रिल रोजी समजणार आहे.

दिवसभरात अशा पद्धतीने मतदान : आज सकाळी 7 वाजल्यापासून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेस शांततेत सुरुवात झाली. सकाळी 7 ते 9 या कालावधीत 6.96 टक्के, सकाळी 11 वाजेपर्यंत 20.57 टक्के, दुपारी 1 पर्यंत 34.18 टक्के, तर दुपारी 3 वाजेपर्यंत 44.93 टक्के, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 55.26 टक्के मतदान, तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण अंदाजित 60.09 टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच 2 लाख 91 हजार 798 मतदारांपैकी 1 लाख 75 हजार च्या आसपास मतदान झाले आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 60.09 टक्के मतदान
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 60.09 टक्के मतदान

वयोगटानुसार आकडेवारी पुढीलप्रमाणे : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 91 हजार 798 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 45 हजार 768 हे पुरुष मतदार, तर 1 लाख 46 हजार 068 स्त्री मतदार आहेत. 12 तृतीयपंथी मतदार आहेत. तर, सैन्य दलातील मतदाराची संख्या ही 95 इतकी आहे.

वयोगटानुसार मतदार :

वय वर्षे 18-19 - 3082
वय वर्षे 20-29 - 46459
वय वर्षे 30-39 - 59381
वय वर्षे 40-49 - 61658
वय वर्षे 50-59 - 53157
वय वर्षे 60-69 - 36302
वय वर्षे 70-79 - 20496
80 वर्षावरील - 11263

'हे' 15 उमेदवार आहेत रिंगणात :

1) जयश्री चंद्रकांत जाधव (काँग्रेस, चिन्ह - हात)
2) सत्यजित उर्फ नाना कदम (भाजपा, चिन्ह - कमळ)
3) यशवंत शेळके (चिन्ह - कप बशी)
4) विजय केसरकर (चिन्ह - ऑटो रिक्षा)
5) शाहीद शेख (चिन्ह - गॅस सिलेंडर)
6) सुभाष देसाई (चिन्ह - सोड रोलर)
7) बाजीराव नाईक (चिन्ह - एअर कंडिशनर)
8) भारत भोसले (चिन्ह - कपाट)
9) मनीषा कारंडे (चिन्ह - दूरदर्शन)
10) अरविंद माने (चिन्ह - कॅरम बोर्ड)
11) अजीज मुस्ताक (चिन्ह - हेलिकॉप्टर)
12) करुणा मुंडे (चिन्ह - शिवण यंत्र)
13) राजेश नाईक (चिन्ह - किटली)
14) राजेश कांबळे (चिन्ह - शिट्टी)
15) संजय मागाडे (चिन्ह - सफरचंद)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.