ETV Bharat / city

कोल्हापुरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरुच; बुधवारी 288 नवे रुग्ण तर चौघांचा मृत्यू

author img

By

Published : Apr 8, 2021, 2:45 AM IST

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. बुधवारी दिवसभरात 288 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

kolhapur hospital
कोल्हापूर रुग्णालय

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. बुधवारी दिवसभरात 288 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी दिवसभरात 89 जणांना डिस्चार्जसुद्धा देण्यात आला आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1464 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 53 हजार 273 इतकी झाली आहे. मंगळवारीसुद्धा 231 कोरोना रुग्ण आढळले होते तर 6 जणांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा - ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध आदेश लागू

जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 53 हजार 273 वर पोहोचली आहे. त्यातील 50 हजार 11 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजरोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1464 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 1798 झाली आहे. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे.

वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

1 वर्षाखालील - 63 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 1972 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 3722 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 28321 रुग्ण
51 ते 70 वर्ष -15312 रुग्ण
71 वर्षांवरील - 3883 रुग्ण

जिल्ह्यात एकूण 53 हजार 273 रुग्ण झाले आहेत.

तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

1) आजरा - 940
2) भुदरगड - 1296
3) चंदगड - 1237
4) गडहिंग्लज - 1593
5) गगनबावडा - 157
6) हातकणंगले - 5484
7) कागल - 1730
8) करवीर - 5912
9) पन्हाळा - 1915
10) राधानगरी - 1280
11) शाहूवाडी - 1396
12) शिरोळ - 2564
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 7910
14) कोल्हापुर महानगरपालिका - 16970
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 2789

हेही वाचा - लसीच्या तुटवड्यानंतर पालिकेला जाग; कांजूर लस साठवणूक केंद्राचे उद्घाटन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.