ETV Bharat / city

भिवंडीत दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू, परिसरात हळहळ - two years old child died in bhiwandi

मृत चिमुरडी बुधवारी सायंकाळच्या सुमारास गावातीलच एका दुकानात खाऊ आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी घरी परत येताना पेव्हर ब्लॉक रोडवर पडल्याने गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

thane police
भिवंडीत दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू, परिसरात हळहळ
author img

By

Published : Oct 2, 2020, 9:45 AM IST

ठाणे - भिवंडीतील कुकसे गावात एका दोन वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तेजल कैलास माळी असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत चिमुरडी बुधवारी सायंकाळच्या सुमारास गावातीलच एका दुकानात खाऊ आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी घरी परत येताना पेव्हर ब्लॉक रोडवर पडल्याने गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र व्हॉट्सअॅपवरील व्हायरल मेसेजमध्ये ती घरासमोर खेळत असताना ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. चिमुरडीच्या काकाने चारचाकी पाठीमागे घेताना त्यात ती सापडल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

मात्र या दुर्दैवी घटनेची नोंद स्थानिक पडघा पोलीस ठाण्यात करण्यात आली नाही. याबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी दिली असून या घटनेची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.