ठाणे - उन्हाच्या काहिलीने समस्त प्राणी मात्रांच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. साप हा थंड ठिकाणी राहणारा प्राणी असल्याने गर्मीच्या ठिकाणांहून थंड ठिकाणी वास्तव्य करण्याकरिता विषारी आणि बिनविषारी सर्प बाहेर पडू लागल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. कल्याण डोंबिवली शहरापाठोपाठ अंबरनाथ शहरातही मानवीवस्तीत साप शिरत असल्याच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे हा साप घराच्या दारावर लावलेल्या सीसीटीव्हीत दिसताच कुटूंबाने घाबरून घरा बाहेर पळ काढला होता.
साप सीसीटीव्हीत दिसताच कुटुंबाने काढला घराबाहेर पळ - ठाणे अंबरनाथ साप घटना
साप दरवाजाला लोंबकडत असल्याचे पाहून त्यांनी घरा बाहेर पळ काढला. तर साप घरात शिरत असतानाच घरातील एका मुलीने दरवाजा बंद केला. त्यानंतर हा साप व्हरांड्याच्या सिलिंगमध्ये दळून बसला होता. त्यानंतर सर्पमित्र प्रकाश गोईल यांना खत्री यांनी कॉल करून साप सिलिंगमध्ये असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र त्या सापाला पकडण्यासाठी गेले असता त्यांनी सिलिंग तोडून त्या सापाला सुखरूप बाहेर काढून पिशवीत बंद केले.

साप पकडताना सर्पमित्र
ठाणे - उन्हाच्या काहिलीने समस्त प्राणी मात्रांच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. साप हा थंड ठिकाणी राहणारा प्राणी असल्याने गर्मीच्या ठिकाणांहून थंड ठिकाणी वास्तव्य करण्याकरिता विषारी आणि बिनविषारी सर्प बाहेर पडू लागल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. कल्याण डोंबिवली शहरापाठोपाठ अंबरनाथ शहरातही मानवीवस्तीत साप शिरत असल्याच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे हा साप घराच्या दारावर लावलेल्या सीसीटीव्हीत दिसताच कुटूंबाने घाबरून घरा बाहेर पळ काढला होता.
सापाला पकडतानाची दृश्य
सापाला पकडतानाची दृश्य
Last Updated : Mar 27, 2022, 4:11 PM IST