ETV Bharat / city

कोरोना चाचणीच्या नावाने प्रवाशांना लुबाडणारा बोगस 'टीसी' गजाआड - बोगस टीसी बातमी

कोरोना चाचणीच्या अहवालाच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या बोगस टीसीला कल्याण रेल्वे पोलिासंनी अटक केली आहे. आशिष बाळकृष्ण सोनवणे, असते त्या ठगाचे नाव आहे.

crime
crime
author img

By

Published : May 26, 2021, 4:59 PM IST

Updated : May 26, 2021, 5:20 PM IST

ठाणे - कोरोना चाचणीच्या अहवालाच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या बोगस टीसीला (तिकीट तपासनीस) कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. आशिष बाळकृष्ण सोनवणे, असे या ठगाचे नाव असून तो कल्याण पूर्वेकडील काटेनवली परिसरात राहणार आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला आशिष याच्या विरोधात यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

जागृत रेल्वे प्रवाशामुळे प्रकार उघड

कल्याण रेल्वे स्थानकातील चार नंबर फलाटावर काल (दि. 25 मे) रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास एक तरुण आपल्या पत्नीसह लोकलची वाट पाहत होता. इतक्यात त्याच्याजवळ आलेल्या आरोपी आशिषने त्याच्याकडे तिकिटाची विचारणा केली. त्या तरुणाने रेल्वेचे तिकीट दाखवताच आरोपी आशिषने त्यांच्याकडे आरटीपीसीआर कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र दाखविण्याची मागणी केली. त्याच्याकडे रिपोर्ट नसल्याचे कळताच आशिषने त्यांच्याकडे 300 रुपयांच्या दंडाची मागणी केली. यामुळे या दाम्पत्याला संशय आला. त्याने त्याला पकडून रेल्वे पोलीसांकडे नेले. रेल्वे पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा बनावट टीसी असल्याचे निष्पन्न झाले.

बोगस टीसी निघाला सराईत गुन्हेगार

पोलिसांनी ठगाला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली असता, सुरत पोलीस ठाण्यासह कल्याणमधील विविध पोलीस ठाण्यात 7 गुन्हे दाखल असून त्याने यापूर्वी किती गुन्हे केले याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. तर रेल्वे प्रवाशांनी अशा बनावट टीसीपासून सावधान रहा, असा काही प्रकार आढळल्यास तत्काळ कल्याण रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रवाशांना कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शार्दूल वाल्मिक यांनी केले आहे.

हेही वाचा - डोंबिवलीच्या प्रोबेस दुर्घटनेला पाच वर्ष पूर्ण; पीडित नुकसान भरपाईपासून वंचित

Last Updated : May 26, 2021, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.