ETV Bharat / city

कोरोना योद्धा डॉक्टरचा सन्मान न करता सोसायटीतील रहिवाशांकडून मुलासह मारहाण - ठाण्यात कोरोना वॉरिअर्स डॉक्टरला मारहाण

कोरोना योद्धा डॉक्टरचा सन्मान न करता त्यांना व त्यांच्या मुलाला सोसायटीतील रहिवाशांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना कोपर रेल्वे स्थानक बाजूला असलेल्या एका सोसायटीत घडली आहे. मारहाणीचा प्रकार घडल्यापासून तक्रारदार कुटूंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून संबंधितांवर कारवाई झाली नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

Corona warrior doctor
कोरोना योद्धा डॉक्टरला मारहाण
author img

By

Published : Nov 9, 2020, 6:34 PM IST

ठाणे - कोरोना योद्धा डॉक्टरचा सन्मान न करता त्यांना व त्यांच्या मुलाला ते राहत असलेल्या सोसायटीतील एका रहिवाशाने ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार कोपर रेल्वे स्थानक बाजूला असलेल्या एका सोसायटीत समोर आला. मात्र याप्रकरणी विष्णु नगर पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यामुळे कोरोना योद्धा डॉक्टरसह कुटुंबीय प्रचंड तणावाखाली आणि भयग्रस्त असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे समाजमाध्यमांवर धमकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हि घटना समोर आली आहे.

कोरोनाची लागण झाल्याने उद्धभवला प्रसंग -
डोंबिवली पश्चिम परिसरातील कोपर रेल्वे स्थानकाच्या बाजुला असलेल्या एका हायप्रोफाईल सोसायटीत इमारत क्रमांक दोनमध्ये तक्रारदार कोरोना योद्धा डॉक्टर (वय, ५७)हे कुटुंबीयासह राहतात. तर त्याच सोसायटीतील इमारत क्रमांक सातमध्ये राहणारे दिलीप माने (वय ४५) या रहिवाशाने डॉक्टर यांना कोरोना झाल्याचे समजल्याने माने यांनी डॉक्टरांच्या २९ वर्षीय मुलाला सोसायटीत व परिसरात धमक्या देत होता. मारहाण झालेले डॉक्टर हे नवी मुंबई महापालिकेतील एका रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. गेल्या महिन्यात ते कोविड रुग्णालयात कार्यरत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातच सोसायटीतील काही रहिवासी सतत त्यांना धमक्या देऊन सोसायटीतील रहिवाशांना न कळवता उपचार घेतले असा आरोप आहे. तर कोविड रुग्णाचे नाव जनतेसाठी खुले करता येत नाही , फक्त सरकारी यंत्रणाच योग्य ती माहिती देते, असे तक्रारदार कुटूंबाचे म्हणणे आहे. यावरूनच सोसायटीत राहणारे दिलीप माने यांनी ३१ ऑक्टोंबर रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास एका सोसायटीच्या गेटवर डॉक्टरांच्या २९ वर्षीय मुलाला धक्का मारून शिवीगाळ केली. त्यावेळी धक्का का मारला, असा जाब मुलाने विचारताच. त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीची खबर डॉक्टर असलेले वडील यांना मिळाल्याने तेही घटनास्थळी भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.

दरम्यान, मारहाणीचा प्रकार घडल्यापासून तक्रारदार कुटूंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून संबंधितांवर कारवाई झाली नसल्याने कोरोना योद्धा डॉक्टरसह कुटुंबीय प्रचंड तणावाखाली आणि भयग्रस्त असल्याचे कुटूंबाच्या सदस्यांकडून सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.