ETV Bharat / city

CCTV Footage : साफसफाई करण्याच्या वादातून बांधकाम व्यावसायिकला बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद - डोंबिवली क्राईम न्यूज

डोंबिवली गोळवली परिसरात दिनकर हाईट्स नावाची तीन मजली इमारत आहे. इमारतीचे मालक आणि बांधकाम व्यावसायिक आशिष गव्हाणे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत (गुरुवारी ) इमारत परिसरातील जागेवर साफसफाई करत होते. तेथे दोघांच्यात बाचाबाची झाली.

CCTV Footage
CCTV Footage
author img

By

Published : Mar 4, 2022, 4:02 PM IST

ठाणे : साफसफाई करण्याच्या वादातून एका बांधकाम व्यावसायिकला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील गोळवली परिसरातील इमारतीत घडली असून मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये (CCTV Footage ) कैद आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास सुरू केला आहे. आशिष गव्हाणे असे बेदम मारहाण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.

सिमेंटचे पत्रे हटवताना वाद
डोंबिवली गोळवली परिसरात दिनकर हाईट्स नावाची तीन मजली इमारत आहे. इमारतीचे मालक आणि बांधकाम व्यावसायिक आशिष गव्हाणे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत (गुरुवारी ) इमारत परिसरातील जागेवर साफसफाई करत होते. त्यावेळी जागेवरील काही सिमेंटचे पत्रे हटवताना निलेश गायकर नावाच्या व्यक्तीने हा पत्रा आमचा आहे जागा आमची आहे. तू पत्रे हटवतो असे सांगितले. या वेळेस आशिष व निलेशमध्ये वाद झाला. या वादातून निलेश गायकर त्याचा भाऊ अमित गायकर याने बांधकाम व्यवसायिक आशिश याला लाकडी दांडके व बांबूने बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीचा प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे.
हेही वाचा - Robbery Near SBI Bank : बँकेसमोरून वृद्ध दाम्पत्याची ५ लाखाची रोकड लुटून आरोपी फरार, नागपुरात एसबीआय बँकेसमोरील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.