ETV Bharat / city

जळगाव तापले, पारा ४३ अंशावर - hnS

आठवडाभरापूर्वी ३६ ते ३८ अंशांवर असलेले तापमान आता ४ ते ५ अंशांनी वाढून ४३ अंशांपर्यंत गेले आहे.

जळगांव तापमान ११
author img

By

Published : Apr 1, 2019, 11:55 AM IST

जळगाव - गेल्या आठवडाभरापासून जळगावाच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे.तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंश सेल्सियसवर गेला आहे. आठवडाभरापूर्वी ३६ ते ३८ अंशांवर असलेले तापमान आता ४ ते ५ अंशांनी वाढून ४३ अंशांपर्यंत गेले आहे.

जळगांवच्या तापमानाबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया

सकाळी १० वाजल्यानंतर उन्हाचा कडाका वाढत असून दुपारी घराबाहेर पडणे मुश्किलहोत आहे. दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तापमानाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. मार्चमध्येच तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी पार केल्याने पुढे एप्रिल आणि मेमहिन्यात काय परिस्थिती असेल, ही चिंता जळगावकरांना पडली आहे.

वाढत्या उन्हामुळे जळगावकरांना आपली दैनंदिन कामे सकाळीच आटोपून घ्यावी लागत आहेत. अगदी अपवादात्मक परिस्थितीतच नागरिक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे.शाळकरी विद्यार्थी, नोकरदार तसेच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना उन्हाच्या कडाक्याचा त्रास सहन करावा लागतोय. उन्हापासून बचाव व्हावा म्हणून प्रत्येकजण डोक्याला पांढरा रुमाल, डोळ्यांचे रक्षण व्हावे म्हणून सनगॉगल घालूनच घराबाहेर पडत आहे. युवती व महिला देखील अंगात सनकोट, डोक्याला स्कार्फ बांधून उन्हापासून बचाव करत आहेत.

दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रताअधिक जाणवत आहे. त्यामुळे लस्सी,ताक, मठठा, लिंबू सरबत, उसाचा रस अशा शीतपेयांची मागणी वाढली आहे. शीतपेयांच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. कलिंगड, खरबूज यांसारख्या फळांना मागणी वाढली आहे. एकंदरीत तापलेलेराजकीय वातावरण आणि वातावरणातील उकाडा या दोन्ही बाबींचा अनुभव जळगावकरांना येतोय.

Intro:Feed send to FTP
जळगाव
जळगावात एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने सर्वत्र राजकीय वातावरण तापलंय. तर दुसरीकडे मार्चमध्येच तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी पार केलीय. राजकीय वातावरण तापल्याने इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या मनाची घालमेल सुरुय. त्याचप्रमाणे वातावरणात उकाडा वाढल्याने जळगावकरांचा चांगलाच घाम निघत आहे.Body:जळगावात गेल्या आठवडाभरापासून तापमानात कमालीची वाढ झाली आहे. तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंश सेल्सियसवर गेला आहे. आठवडाभरापूर्वी ३६ ते ३८ अंशांवर असलेलं तापमान आता ४ ते ५ अंशांनी वाढून ४३ अंशांपर्यंत गेलंय. वाढत्या उकाड्याने जळगावकरांच्या जिवाची काहिली होत आहे. सकाळी १० वाजेनंतर उन्हाचा कडाका वाढत असून दुपारी घराबाहेर पडणे मुश्किल होत आहे. दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तापमानाचा सर्वाधिक कहर दिसून येतोय. मार्चमध्येच तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी पार केल्याने पुढे एप्रिल आणि मे  महिन्यात काय परिस्थिती असेल, ही चिंता जळगावकरांना आहे.

बाईट: संदीप पाटील, स्थानिक नागरिक
प्रदीप पाटील, स्थानिक नागरिक

वाढत्या उन्हामुळे जळगावकरांना आपली दैनंदिन कामे सकाळीच आटोपून घ्यावी लागत आहेत. अगदी अपवादात्मक परिस्थितीतच नागरिक घराबाहेर पडत असल्याचं दिसून येत आहे. शाळकरी विद्यार्थी, नोकरदार तसेच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना उन्हाच्या कडाक्याचा त्रास सहन करावा लागतोय. उन्हापासून बचाव व्हावा म्हणून प्रत्येकजण डोक्याला पांढरा रुमाल, डोळ्यांचे रक्षण व्हावे म्हणून सन गॉगल घालूनच घराबाहेर पडत आहे. युवती व महिला देखील अंगात सनकोट, डोक्याला स्कार्फ बांधून उन्हापासून बचाव करत आहेत.Conclusion:दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. त्यामुळे लस्सी, ताक, मठठा, लिंबू सरबत, उसाचा रस अशा शीतपेयांना मागणी वाढली आहे. शीतपेयांच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. कलिंगड, खरबूज यासारख्या शीत फळांना देखील मागणी वाढली आहे. एकंदरीत तापलेलं राजकीय वातावरण आणि वातावरणातील उकाडा या दोन्ही बाबींचा अनुभव जळगावकरांना येतोय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.