औरंगाबाद - सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथील सुमीत किशोर पारधे या युवकाने जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या पूर्वी या युवकाचे फेसबुकवर आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हणत आत्महत्या केली असून याला मी स्वतः जबाबदार आहे.
'माझ्या पालकांना आर्थिक मदत करावी'
माझ्यामुळे समाजात माझ्या आई-वडिलांना मान राहिला नाही. माझ्या मरणानंतर कुठली ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. कुठला ही वाद होणार नाही याची काळजी घ्यावी. शासनाने माझ्या पालकांना आर्थिक मदत करावी, असे म्हणत या युवकाने जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार म्हणू नये, असे म्हटले असले तरी त्याने ही आत्महत्या का केली असा प्रश्न समोर उभा राहत आहे.