औरंगाबाद - खराब अन्न खाल्ले की त्रास होतो याचा अनुभव प्रत्येकाला येतो. त्यामुळे प्राण देखील जाऊ शकतात अस म्हणले तर आश्चर्य वाटेल. मात्र अशीच घटना औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात समोर आली आहे. खराब चिकन राईस खाल्याने लिव्हरवर परिणाम झाला आणि त्यामुळे सचिन पिछोरे या युवकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
- अशी घडली घटना
एका खासगी कंपनीत काम करणारा सचिन पिछोरे हा चुलत भाऊ संतोष पिछोरे सोबत गावाकडून कामानिमित्त वाळूज परिसरात येऊन राहत होता. सचिनने संतोष याला फोन करून आपला डबा आज आला नसल्याने चिकन राईस घेऊन येत असल्याचे त्याने सांगितले. काही वेळात तो रूमवर गेला. त्यावेळी सचिन आणि संतोष दोघांनी चायनीस चिकन राईसवर ताव मारला. दुसऱ्या दिवशी सचिनला उलटी मळमळ होऊ लागली. तपासणीसाठी तो हेडगेवार रुग्णालयात आला. त्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र आपण असेच बरे होऊ असे सचिनला वाटले आणि तो निघून गेला. मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा त्रास वाढलाने तो रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. लिव्हरवर जास्त परिणाम झाल्याने रक्त गोठावण्याची प्रक्रिया विस्कळीत झाली होती. त्यामुळे रक्त खूप जास्त पातळ झाले होते. उलटीमधून, तोंडातून, लघवीतून, स्कीनमध्ये रक्त उतरले होते. दोन वेळा प्लाझमा देऊनही परिणाम न झाल्याने सचिनचा मृत्यू झाल्याची माहिती हेडगेवार रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. आनंद पाठक यांनी दिली आहे.
- भाऊ बचावला
सचिनचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र संतोष थोडक्यात बचावला आहे. बिर्याणी मागवलेल्या दिवशी सचिनने रूमवर बिर्याणी मगावली. त्यावेळी मेडिकल दुकानावर काम करणाऱ्या संतोष देखील बिर्याणी खाल्ली होती. त्यामुळे सचिनसोबत संतोषला देखील त्रास झाला होता. मात्र संतोषचा डबा आलेला असल्याने त्याने कमी प्रमाणात चिकन राईस खाल्ला होती. त्यामुळे त्याला त्रास कमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. आनंद पाठक यांनी दिली.
- मृत युवकाला होता डेंगू
बिर्याणी खाल्यावर विषबाधा झालेल्या सचिनवर उपचार करत असताना त्याच्या काही तपासण्या करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये कावीळ आणि डेंगू यांचा समावेश होता. कावीळ तपासणी तपासणीत बाधा आढळून आली नसली तरी डेंगू तपासणी अहवालात बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. मृत्यू लिव्हरवर परिणाम झाल्याने झाला असून, त्याला आणि त्याच्या मित्राला देखील त्रास झाल्याने खराब बिर्याणीमुळे हे होऊ शकते, हा निष्कर्ष काढता येऊ शकतो, असे डॉ. आनंद पाठक यांनी सांगितले.
- 'शिळे आणि खराब अन्न टाळा'
आपल्याकडे सर्वसाधारण कुटुंबांमध्ये शिळे अन्न सकाळी गरम करून खाल्ले जाते. मात्र त्याचा परिणाम काही प्रमाणात शरीरावर होतो. त्याचबरोबर बाहेरून अन्न आणताना ते कसे तयार केले असेल याबाबत खात्री न करता आपण ते घेऊन येतो. त्याचे परिणाम म्हणून विषबाधा होते. उलटी आणि जुलाब असे लक्षण दिसून येतात. औषध घेतले की आपण बरे पण होतो. मात्र त्याचे परिणाम गभीर होऊ शकतात हे घडलेल्या घटनेवरून लक्षात येत आहे. त्यामुळे शिळे आणि खराब अन्न घेऊ नका, असे आवाहन डॉ. आनंद पाठक यांनी केले आहे.
हेही वाचा - Device Will Alert While Driving : वाहन चालवताना ड्रायव्हरला डुलकी लागण्यापासून रोखणारे डिव्हाइस