ETV Bharat / city

Aurangabad Crime News : चोरीच्या संशयावरून तरुणाला लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण; तरुणाचा जागीच मृत्यू - शताब्दी नगर परिसरात तरुणाला मारहाण

औरंगाबाद येथील शताब्दी नगर परिसरात एक धक्कादायक घटना ( Aurangabad Crime News ) घडली आहे. येथील काही नागरिकांनी चोरीच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण ( Young man beaten to death in aurangabad ) केली आहे. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू ( Young man death in beaten ) झाला आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव मनोज शेषराव आव्हाड असे आहे.

Aurangabad Crime News
चोरीच्या संशयावरून तरुणाला लठ्याकाठ्याने बेदम मारहाण
author img

By

Published : Apr 21, 2022, 1:00 PM IST

Updated : Apr 21, 2022, 3:18 PM IST

औरंगाबाद - चोरी केल्याच्या संशयावरून कामगाराला आठ ते दहा जणांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण ( Young man beaten to death in aurangabad ) केल्याची धक्कादायक घटना शताब्दी नगर येथे उघडकीस आली. दरम्यान मारहाण करत असतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू ( Young man death in beaten ) झाला आहे. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादेत तरुणाला लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज शेषराव आव्हाड (वय २७ वर्ष) रा.मेघवाल सभागृह एन १२ हडको असे मयत तरुणाचे नाव आहे. मनोज हा मेघावाले सभागृहात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत होता. एक महिन्यापूर्वी मनोज याची पत्नी माहेरी गेली असल्याने तो सभागृहात राहत होता. दरम्यान बुधवार दि.२० रोजी खरात यांचे मुले घरी येऊन मनोज याला कामासाठी घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी मनोजच्या लहान भावाच्या मोबाईलवर मनोजला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ पाठवला. यावेळी तात्काळ त्याला पाहण्यासाठी त्याच्या कामाच्या ठिकाणी गेलो असता तेथे आढळून आला नाही. त्याला घाटी रूग्णालयात मारहाण केलेल्या तरुणांनी दाखल केले होते. व ते तिथून पळून गेले, अशी माहिती मनोज भावाने दिली. दरम्यान, डॉक्टरांनी मनोज त्याला तपासून मृत घोषित केले आहे.

गुन्हा दाखल, दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात - मनोज याच्या आईच्या तक्रारीवरून सतिष खरे, आनंद सोकळस, आनंद गायकवाड, सागर खरात, अष्टपाल गवई यांच्यासह आठ जणांविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

हेही वाचा - Boyfriend physically abuses girlfriend's daughter: धक्कादायक, प्रियेसीच्या अल्पवयीन मुलीवर प्रियकराचा अनैसर्गिक अत्याचार

Last Updated : Apr 21, 2022, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.