ETV Bharat / city

औरंगाबादमध्ये तरुणाला बेदम मारहाण; तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल - औरंगाबादमध्ये तरुणाला मारहाण

घराकडे निघालेल्या तरुणाला रस्त्यात अडवत अज्ञात तिघांनी बेदम मारहाण केली. यावेळ विनवण्या करणाऱ्या तरुणाला दगडाने माराहान करत रक्तबंबाळ केले. ही घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अदालत रोडवरील सतीश मोटर्सजवळ घडली.

Aurangabad
Aurangabad
author img

By

Published : Sep 17, 2021, 7:50 AM IST

Updated : Sep 17, 2021, 8:02 AM IST

औरंगाबाद - बहिणीच्या सासूला पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हल्समध्ये सुडवून घराकडे निघालेल्या तरुणाला रस्त्यात अडवत अज्ञात तिघांनी बेदम मारहाण केली. यावेळ विनवण्या करणाऱ्या तरुणाला दगडाने माराहान करत रक्तबंबाळ केले. ही घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अदालत रोडवरील सतीश मोटर्सजवळ घडली. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया

विनाकारण केली शिवीगाळ -

राधेय भगवान जोशी (२१) रा. विष्णुनगर असे जखमी तरुणाचे नाव आहे. राधेय यांच्या घरी महालक्ष्मी सणासाठी पुणे येथील बहिणीची सासू आल्या होत्या. त्या १३ सप्टेंबर रोजी रात्री १०.४० वाजता पुणे येथे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसमध्ये नातेवाइकांना बसवून देण्यासाठी राधेय कार घेऊन अदालत रोडवरील ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयाजवळ गेला होता. नातेवाइकांना बसमध्ये बसवून तो कारने घराकडे निघाला. दरम्यान, वळणावर ट्रिपलसीट विनाक्रमांक दुचाकीस्वार तरुणांनी राधेयला थांबवत शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावेळी राधेयने त्याने का शिवीगाळ करता, असे विचारले असता. त्यांनी त्याला बेदम मारहाण सुरू केली. यावेळी राधेय हा वाचवण्यासाठी मित्राच्या दुकानाकडे धावत असताना त्यांनी दगड राधेयच्या दिशेनी भिरकावले. यातील काही दगड त्याच्या डोक्यात लागल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी ते तिघेही निघून गेले. जखमी अवस्थेत राधेयला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुन्हा दाखल -

याप्रकरणी राधेय यांच्या तक्रारारीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी राधेयची आई रेणुका जोशी यांनी केली आहे. माझा एकुलता एक मुलगा ज्याला आम्ही पाच बोट लावली नाही. त्याला काहीही कारण नसताना बेदम मारहाण करण्यात आली. यामुळे जोपर्यंत माझ्या मुलाला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत स्वस्त बसणारा नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर; मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुताम्यांना करणार अभिवादन

Last Updated : Sep 17, 2021, 8:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.