ETV Bharat / city

Subhash Desai On Property Tax : मुंबईप्रमाणे राज्यातील अन्य शहरातही मालमत्ता कर माफ होणार? सुभाष देसाईंनी दिले संकेत - मालमत्ता करात सवलत

मुंबई शहरातील ५०० चौरस फूट क्षेत्रावर असलेल्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय नुकताच ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय फक्त मुंबईपुरताच का?, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. तर ही योजना हळूहळू सर्वच (Property tax be waived in other city in state) शहरात राबवली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री (Industry Minister Subhash Desai ) आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

property tax be waived
property tax be waived
author img

By

Published : Jan 3, 2022, 3:18 PM IST

Updated : Jan 3, 2022, 6:03 PM IST

औरंगाबाद - मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेतील पाचशे स्क्वेअर फुटांच्या घरांना करसवलत देण्याचा महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला आहे. मुंबई ही सुरुवात आहे आणि इतर शहरात देखील शहरांना अशा सवलती देणार असल्याचे (Property tax be waived in other city in state)संकेत उद्योगमंत्री सुभाष देसाई (Industry Minister Subhash Desai ) यांनी औरंगाबाद येथे दिले.

मुंबई शहरातील ५०० चौरस फूट क्षेत्रावर असलेल्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय नुकताच ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय फक्त मुंबईपुरताच का ? ,असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. तर ही योजना हळूहळू सर्वच शहरात राबवली जाईल, (Property tax be waived in other city in state) अशी माहिती उद्योगमंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. लसीकरणाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी औरंगाबादेत आले असता देसाईंनी माध्यमांशी संवाद साधला.

पत्रकार परिषदेत बोलताना सुभाष देसाई

हे ही वाचा - मुंबईकरांना राज्य सरकारकडून नववर्षाचं मोठं गिफ्ट.. 500 स्क्वेअर फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ

लसीकरण केल्यास तिसरी लाट रोखणे शक्य..

औरंगाबाद जिल्ह्याच्या लसीकरणाला (Corona vaccination in Aurangabad) सोमवारपासून सुरुवात झाली. उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. एक जानेवारीपासून ऑनलाइन रजिस्ट्रेशनला प्रत्यक्षात सुरुवात झाली होती. जिल्ह्यात दोन लाख 13 हजार 823 मुले आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेचे दोन शाळामध्ये, 2 आरोग्य केंद्रात तर ग्रामीण भागांमध्ये दहा केंद्रांवर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार सज्ज असून महाराष्ट्रात सुमारे 80 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित लोकांनी लवकरात लवकर लस घ्यावी तसेच सर्वांनीच कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करावे, असं केल्यास आपण तिसरी लाट निश्चितच रोखू शकतो, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण प्रक्रियेला वेग आला आहे. पुढील पंधरा दिवसात उद्दीष्ट पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. लसीकरण केल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. लसीकरणामुळे येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षेसाठी अडचण येणार नाही. लहान मुलं कुठलीही भीती न बाळगता लस घ्यायला पुढाकार घेत आहेत, असेही पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

Last Updated : Jan 3, 2022, 6:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.