औरंगाबाद - शहराचे नाव बदलण्यासाठी एक हजार कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे. हा खर्च जनतेच्या पैशातूनच केला जाईल, असे एआयएमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. शहराचे नाव संभाजीनगर केले तर काय फरक पडणार आहे? उलट ऐतिहासिक ओळख मिटवली जाईल. नव्या नावाने ओळख मिळायला किती काळ जाईल याचा विचार केला का? असे प्रश्न खा. जलील यांनी उपस्थित केले. नाव बदलणे सोपे नाही. सरकारच्या तिजोरीवर शंभर कोटींचा बोजा येईल. असे केले तर सर्वसामान्यांना त्यांचे आधार कार्ड, ओळख पत्र, पासपोर्ट, रेशन कार्ड यांच्यात बदल करावे लागतील. शैक्षणिक प्रमाणपत्र बदलावे लागतील. विदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांना ते बदल करण्यासाठी परत यावे लागेल. उद्धव ठाकरे, नाना पाटोळे, शरद पवार यांनी येऊन लोकांसोबत रांगेत उभे राहावे, अशी टीका खा. इम्तियाज जलील यांनी केली.
शरद पवार यांनी त्याचवेळी बोलायचे होते - शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव पारीत करताना आम्हाला त्याची माहिती नव्हती, असे शरद पवार यांनी सांगितले. मात्र, त्यासाठी औरंगाबादला यावे लागले. ज्या दिवशी ही घोषणा झाली त्याच दिवशी त्यांनी आपली भूमिका का स्पष्ट केली नाही. मात्र, आता इकडे आल्यावर आपल्या पक्षाची प्रतिमा चांगली करण्याची धडपड करत आहेत. नामांतराबाबत शहरात मतदान घेऊन निर्णय घ्या म्हणजे कळेल की जनमत कळेल, असे आव्हान खा. इम्तियाज जलील यांनी दिले आहे.
काय म्हणाले होते शरद पवार - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी औरंगाबादमध्ये दोन दिवसांपूर्वी सांगितले होते की, औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अधिकारात घेतला होता. असा निर्णय घेतला जाणार आहे याची राष्ट्रवादी काँग्रेसला कल्पनाही नव्हती. तथापि, औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय ज्या दिवशी मंत्रिमंडळ बैठकीत झाला त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मंत्रिमंडळात हजर होते. त्यावेळी त्यांच्या मंत्र्यांकडून कोणताही विरोध झाला नव्हता.
तेव्हा पवारांनी केले होते समर्थन - औरंगाबादचे संभाजीनगर नाव करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या बैठकीत राष्ट्रवादीचेही मंत्री उपस्थित होते. हा निर्णय झाल्यावर स्वतः शरद पवार यांनीही ही अनेक दिवसांची मागणी होती, असे म्हणत या निर्णयाचे समर्थन केले होते. मात्र, काही दिवसांतच राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका बदलली. यावरच खासदार इम्तियाज जलील आक्षेप घेतला आहे. संभाजीनगर नामकरण करायला विरोध होता तर त्याचवेळी शरद पवारांनी विरोध का केला नाही, असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - BJP's Mission 134 on BMC Election : मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसवण्याचे लक्ष्य; भाजपचे मिशन 134