ETV Bharat / city

हिजाब संविधानाने दिलेला अधिकार... वंचित युवा आघाडीचे आंदोलन

author img

By

Published : Feb 9, 2022, 9:16 PM IST

Updated : Feb 9, 2022, 9:26 PM IST

खांद्यावर भगवा रुमाल टाकून् केलेल्या कृत्याने जगात चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे या कृत्याला माफी देता येणार नाही. त्यामुळे त्याचा निषेध करत असल्याचे ( Protest against Karnataka Hijab incident ) वंचित प्रदेश युवाध्यक्ष निलेश विश्वकर्मा ( Vanchit Pradesh Leader Nilesh Wishvkarma ) यांनी म्हटले आहे.

वंचित युवा आघाडीचे आंदोलन
वंचित युवा आघाडीचे आंदोलन

औरंगाबाद - कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे पडसाद औरंगाबादमध्ये उमटले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ( Vanchit Yuva Aghadi Agitation ) हिजाबच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. सरकारने मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करू नये, अन्यथा सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा आंदोलक महिलांनी ( Women agitation to support Hijab ) दिला आहे.

मुस्लिम मुलींच्या प्रगतीवर परिणाम
कर्नाटक येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 9 फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात आले. यावेळी मुस्लिम महिलांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. मुस्लिम महिलांना बुरखा घालण्याचा घटनेनुसार अधिकार आहे. त्यांच्या स्वतःच्या मर्जीने बुरखा परिधान करत असतात. मुस्लीम तरुणींना प्रगतीपासून दूर करण्यासाठी असे वक्तव्य केले जात आहेत. यापुढे या बाबतीत वक्तव्य केले तर मुस्लीम महिला रस्त्यावर उतरून जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी मुस्लिम महिला आंदोलकांनी दिला आहे.

वंचित युवा आघाडीचे आंदोलन

हेही वाचा-Maharashtra Budget session :अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होण्याची दाट शक्यता

देशाच्या राजकारणमुळे पिढीवर परिणाम
कर्नाटकमध्ये झालेल्या प्रकारामुळे देशात संतापाची लाट उठली आहे. देशात सुरू असलेल्या राजकारणाचा परिणाम नव्या पिढीवर होत आहे. मुस्लिम मुलींनी बुरखा घातला म्हणून त्यांना महाविद्यालयात प्रवेश नाकारला. खांद्यावर भगवा रुमाल टाकून् केलेल्या कृत्याने जगात चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे या कृत्याला माफी देता येणार ( Protest against Karnataka Hijab incident ) नाही. त्यामुळे त्याचा निषेध करत असल्याचे वंचित प्रदेश युवाध्यक्ष निलेश विश्वकर्मा ( Vanchit Pradesh Leader Nilesh Wishvkarma ) यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-PM Modi Interview Live : 'देशात भाजपाची लाट, पाचही राज्यांच्या निवडणुका जिंकणार'; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

Last Updated : Feb 9, 2022, 9:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.