औरंगाबाद - केंद्र सरकारने शेतकऱ्यांविरोधी तयार केलेले तीन काळे कायदे तात्काळ रद्द करावे, या प्रमुख मागणी इतर मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
विभागीय आयुक्तांना दिले निवेदन-
केंद्र सरकारने शेतीसंदर्भात केलेले तीन कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे हे कायदे रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
कायद्यामध्ये हमीभावाची तरतूद नाही-
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी जे कायदे पारित केले. या कायद्यामध्ये हमीभावाची तरतूद नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याची तरतूद आहे. सावकाराच्या जागी करार शेतकऱ्याची संकल्पना त्यांनी आणली आहे. हे सर्व कायदे रद्द करण्यात यावे यासाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलनाचे करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष (पूर्व) प्रभाकर बकले, जिल्हाध्यक्ष (पश्चिम) योगेश बन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष लता बामणे, शहर अध्यक्ष (पश्चिम) संदीप शिरसाट, शहर अध्यक्ष (पूर्व) डॉ.जमिल देशमुख, महिला शहर अध्यक्ष वंदना नरवडे आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा- अँटिलिया प्रकरणातील तपास अधिकारी एनकाऊंटर स्पेशालिस्ट सचिन वझे कोण?