ETV Bharat / city

Aurangabad children Vaccination : लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात, शहरात सहा केंद्रावर लसीकरण

पंधरा ते अठरा वयोगटामधील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सोमवारपासून सुरुवात ( 15 to 18 years Childrens Vaccination ) झाली. औरंगाबाद शहरात सहा ठिकाणी लहान मुलांच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन शाळांचा तर चार आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. त्यापैकी दोन शाळांमधील लसीकरण मर्यादित काळासाठी तर चार आरोग्य केंद्रावर अमर्यादित काळासाठी लहान मुलांचे लसीकरण केले जाईल ( Aurangabad vaccination centers ) अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

children Vaccination in Aurangabad
लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात
author img

By

Published : Jan 3, 2022, 1:16 PM IST

औरंगाबाद - पंधरा ते अठरा वयोगटामधील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सोमवारपासून सुरुवात ( 15 to 18 years Childrens Vaccination ) झाली. औरंगाबाद शहरात सहा ठिकाणी लहान मुलांच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन शाळांचा तर चार आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. त्यापैकी दोन शाळांमधील लसीकरण मर्यादित काळासाठी तर चार आरोग्य केंद्रावर अमर्यादित काळासाठी लहान मुलांचे लसीकरण केले जाईल ( Aurangabad vaccination centers ) अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात

70 हजार मुलांचे शहरात उद्दिष्ठ -

लहान मुलांच्या लसीकरणासाठी विशेष तयारी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आली. केंद्र सरकारने लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोहीम जाहीर केल्यानंतर, लहान मुलांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्यास सुरुवात करण्यात आली होती. लहान मुलांना लस देताना त्यांच्या पालकांची संमती आवश्‍यक आहे. त्यामुळे लसीकरण केल्यानंतर मुलांना कुठलीही बाधा होणार नाही, याबाबत पालकांची जनजागृती करण्यात आली आणि त्यानंतर लसीकरण हे सुरू करण्यात आले. शहरांमध्ये जवळपास 70 हजार लहान मुलाची नोंदणी अपेक्षित आहे आणि ते उद्दिष्ट पुढील पंधरा दिवसात गाठण्याचा मानस असल्याचे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी दिली.

शिक्षकांनी केली नोंदणीसाठी मदत -

लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर मोठा प्रतिसाद दिसून आला. अनेक मुलांच्या पालकांनी घरीच ऑनलाईन पद्धतीने लसीकरणाबाबत नोंदणी केली होती. काही विद्यार्थ्यांची नोंदणी शिक्षकांनी शाळेत करून घेतली. यासाठी काही शिक्षक हे राखीव ठेवण्यात आले होते. विद्यार्थी आले की त्यांचे नोंदणी घेऊन, त्यानंतर लसीकरण करून घेणे आणि त्यांच्यासोबत काही वेळ बसून त्यांना वाटत असलेली भीती दूर करण्याचे काम शिक्षकांनी केले. त्यामुळे लस घेताना विद्यार्थ्यांना भीती वाटत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

हेही वाचा - Children Vaccination in Kolhapur : कोल्हापुरात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.