औरंगाबाद: निवडणूक आयोगाच्या निर्णयात भाजपचा हात आहे, असा आरोप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाकडून केला गेला आहे. मात्र वेगळी यंत्रणा आहे, त्यांनी घेतलेला निर्णय आहे. त्यात भाजपला जबाबदार धरणे चुकीचे असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड Union Minister Bhagwat Karad यांनी सांगितलं आहे.
शरद पवार जानते नेते शिवसेनेचे चिन्ह गोठण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल शरद पवार यांनी याबाबत कुठलेही आश्चर्य वाटलं नाही असं म्हणलं. यावर बोलताना भागवत कराड यांनी टीका केली आहे. शरद पवार जुने जाणते नेते असून मागचे पन्नास वर्षाहून अधिक काळ ते राजकारणात सक्रिय आहेत. त्यांना निवडणूक आयोगाची प्रक्रिया माहित आहे. ते देखील अशाच काही बाबींचा भाग होते, अशी टीका कराड यांनी केली आहे. नाना पटोले यांनी भाजपवर केलेल्या टीका चुकीच्या आहेत. शिवसेना का फुटली हे सर्वांनाच माहिती आहे. मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षातील आमदारांना भेटत नव्हते. असंतोष होता, त्यामुळे पक्ष फुटला त्यात भाजपाचा संबंध कुठे येतो ? असा प्रश्न कराड यांनी उपस्थित केला आहे.
भाजपा महाराष्ट्राचा विकास करणारा शिवसेना फुटी बाबत भाजपवर टीका केली जात आहे. मात्र भाजप स्वतःच्या पक्षाचा विस्तारासोबतच महाराष्ट्राच्या विकासाबाबत काम करणार आहे. राज्य आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून विविध योजना महाराष्ट्रात राबवून विकासाबाबत पुढाकार घेणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षात काय चाललं याबाबत भाजप जबाबदार होत नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे त्यांच्या बाबत स्वतः निर्णय घेतील. मात्र भाजप पक्ष वाढीसाठी आणि राज्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहील असं मत केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केले आहे.