औरंगाबाद - चिखलठाणा एमआयडीसी परिसरामध्ये असलेल्या सिपेट सेंटरमध्ये अज्ञात माथेफिरूंनी तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली असून रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे. ही तोडफोड करण्यामागे नेमका काय उद्देश होता, याचा तपास आता सिडको एमआयडीसी पोलीस करत आहेत.
सेंटरला सुरक्षारक्षकच नाही -
गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिका प्रशासनाने कोविड रुग्णांसाठी हे रुग्णालय सुरु करण्यात आले होते. तसेच रुग्णांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकही नेमण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या रुग्णालयामध्ये सुरक्षा रक्षक काढून घेण्यात आला होता. माथेफिरूने याचाच फायदा घेत ही तोडफोड केली.
काही दिवसांपासून बंद होते रुग्णालय -
कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी प्रशासनातर्फे चिकलठाणा एमआयडीसी येथे सिपेट रुग्णालय सुरू करण्यात आले होते. या रुग्णालयांमध्ये यंत्रणादेखील सज्ज होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी झाल्याने तीन महिन्यांपासून हे रुग्णालय बंद करण्यात आले होते.
हेही वाचा - जलयुक्त शिवार अनियमितता : चौकशीचे लाचलुचपत विभागाचे आदेश, देसरडा यांची माहिती