औरंगाबाद (कन्नड) - बैलगाडीला दुचाकी धडकल्याने दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना कन्नड तालुक्यात हिवरखेडा गौतळा येथे बुधवारी रात्री घडली. ऋषिकेश चव्हाण आणि कुणाल चव्हाण असे दोन मयतांची नाव आहेत.
असा घडला अपघात -
10 नोव्हेंबरच्या रात्री हिवरखेडा गौतळा रोडवरील विनायकराव पाटील कॉलेजजवळ बैलगाडी व दुचाकीची धडक झाली. दोन्ही युवक दुचाकीवरून ऋषिकेश चव्हाण (वय 20) आणि कुणाल चव्हाण ( वय 20) हे शहराकडे येत होते. तर किशोर जाधव हे आपली बैलगाडी घेवून हिवरखेडाकडे जात होते. तेव्हा बैलगाडी व दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाली.
एका युवकाचा जागीच मृत्यू -
सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली आणि दोन्ही तरुणांना तात्काळ शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. कुणाल चव्हाणला डॉक्टरांनी मयत घोषित केले. तर ऋषिकेश चव्हाणचा रुग्णालयात नेत असताना रस्त्यामध्ये मृत्यू झाला. कमी वयातील तरुणावर काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - ST Strike : लालपरी शंभर टक्के बंद; ९१८ जणांवर निलंबनाची कारवाई