ETV Bharat / city

दुचाकी चोरट्यांना सापळा रचून केली अटक; वाळूज पोलिसांची कारवाई - mids waluj police news

एका व्यक्तीच्या चोरीला गेलेल्या गाडीच्या शोधात पोलिसांनी खबऱ्यामार्फत दोन आरोपींची नावे समजली. यानंतर पोलीसांनी या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले असते, त्यांच्याकडून ६ दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

एमआयडीसी वाळूज पोलीस
एमआयडीसी वाळूज पोलीस
author img

By

Published : Oct 11, 2020, 3:25 PM IST

औरंगाबाद - एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या पथकाने दुचाकी चोरणाऱ्या दोघांना रविवारी रांजणगाव(शे.पू) येथून अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ५५ हजाराच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत. सखाराम विश्वनाथ जगताप (वय २९) रा. ओमसाई नगर रांजणगाव(शे पू) आणि प्रताप विष्णू कोरडे (वय २९) रा. माऊली नगर कमळापूर रोड अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

न्यू श्रीराम नगर येथील ऋषिकेश लक्ष्मण तुपे यांनी त्यांची दुचाकी ८ ऑक्टोबरला घरासमोर उभी केली होती. कोणीतरी अज्ञाताने ती चोरून नेल्याची तक्रार त्यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी शोध घेत असताना, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना खबऱ्याने माहिती दिली की, तुपे यांची गाडी जगताप आणि कोरडे यांनी चोरली आहे. या माहितीनुसार दोघांच्या शोधा घेण्यासाठी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पथक रवाना झाले. रांजणगाव(शे पू) येथे रविवारी दोघे येणार असल्याचे कळताच पोलिसांनी सापळा रचून त्यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक शाईन, एक पल्सर, दोन स्प्लेनडर प्रो, एक स्प्लेंडर प्लस, एक सिबी शाईन अशा १ लाख ५५ हजार रुपयांच्या सहा दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गौतम वावळे, सफौ रमाकांत पटारे, मोहन पाटील पथक शामिल होते.

हेही वाचा - मराठा राजघराण्याचा गौरव; विजयाराजे सिंधियांच्या सन्मानार्थ १०० रुपयांचे नाणे जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.