ETV Bharat / city

Electric City Bus : औरंगाबाद शहरात इलेक्ट्रिक सिटी बसची ट्रायल सुरु, लवकरच धावणार 35 बस - पर्यावरणाला पूरक अश्या बसेस

औरंगाबाद येथे पर्यावरणाला पूरक अश्या इलेक्ट्रिक बसची प्राथमिक चाचणी (Trials of electric city bus started in Aurangabad city ) शहारातील काही भागांमध्ये घेण्यात येत आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी ने शहरात सार्वजनिक वाहतुकीकरीता 35 इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यासाठी टेंडर काढले होते. ( 35 buses will run soon )

Electric city bus
औरंगाबाद शहारात इलेक्ट्रिक सिटीबस
author img

By

Published : Jul 5, 2022, 2:59 PM IST

औरंगाबाद : पर्यावरणाला पूरक अश्या इलेक्ट्रिक बसची प्राथमिक चाचणी (Trials of electric city bus started in Aurangabad city ) शहारात काही भागांमध्ये घेण्यात येत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू करण्यात येणारी इलेक्ट्रिक बसचे फील्ड ट्रायल सुरू करण्यात आले आहे. यशस्वी चाचणी झाल्यावरच एजन्सी अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती मनपा तर्फे देण्यात आली.

लवकरच 35 बस होणार दाखल : मनपा आयुक्त, प्रशासन आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या संयुक्तविद्यमाने औरंगाबाद स्मार्ट सिटी ने शहरात सार्वजनिक वाहतुकीकरीता 35 इलेक्ट्रिक बसेस ( 35 buses will run soon ) सुरू करण्यासाठी टेंडर काढले होते. निविदेत तांत्रिक दृष्ट्या पात्र ठरलेल्या एजन्सी कडून फील्ड ट्रायल करण्यात येणार आहे. हे ट्रायल औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे थर्ड पार्टी ऑडिट साठी नियुक्त एजन्सी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ह्यांचा देखरेखीखाली करण्यात येत आहे. बसेसचे ट्रायल द्वारे ट्रॅफिक परिस्थिती मध्ये बसचा परफॉर्मन्स, बॅटरीची क्षमता, चार्जिंग यंत्रणा व अन्य तांत्रिक बाबी समजून येतील. त्यानंतर पूर्ण क्षमतेने बस धावण्याबाबत निर्णय होईल, असे स्मार्ट सिटी बसचे प्रकल्प सहयोगी अधिकारी ऋषिकेश इंगळे यांनी सांगितले. यावेळी स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, स्मार्ट सिटी बस चे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवणिकर, उपव्यवस्थापक मुकुल देव, सिद्धार्थ बनसोड, प्रकल्प सहयोगी ऋषिकेश इंगळे व अन्य उपस्थित होते.

बसच्या डीझाईन मध्ये नागरिकांचा वाटा : औरंगाबाद शहरात इलेक्ट्रिक बस धावण्याबाबत घेण्यात येणाऱ्या चाचणीत अनेक बाबी स्पष्ट होतील, असे मनपातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे इलेक्ट्रिक बसचे 2 दिवस ट्रायल झाल्यांनतर आर्थिक निविदा उघडण्यात येईल. त्यानंतर एजन्सी अंतिम करण्यात येईल. एजन्सी ठरल्यावर नव्याने येणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस दिसण्यात कशी असावी, यासाठी नागरिकांकडून डिझाईन मागवले जाणार आहेत. बसचे डिझाईन लोकसहभागा द्वारे ठरवले जाणार आहे. सगळ्यांमधुन बसचे जे एक डिझाईन निवडण्यात येईल, त्यांला आकर्षक पारितोषिक दिले जाईल. ही स्पर्धा लवकरच नागरिकांसाठी सुरू केली जाईल, असे प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

हेही वाचा : दुबईतून आलेल्या व्यक्तीची पॉन्डिचेरीतून सुटका, 15 लाखांसाठी अपहरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.