ETV Bharat / city

Transgender Felicitated : 'इथे' होतो तृतीयपंथीयांचा सत्कार, दहा दिवस तृतीयपंथी समाज गातो कव्वाली

author img

By

Published : Oct 11, 2022, 3:00 PM IST

खुलताबाद येथील उरुसमध्ये तृतीयपंथीयांना विशेष महत्त्व दिलं (Transgender Felicitated at Aurangabad) जातं. दहा ते पंधरा दिवस त्यांच्या राहण्याची विशेष सोय केली जाते. प्रत्येक रात्री त्यांच्या कव्वालीची मैफिल देखील (Transgender sings qawwali in Urus of Khultabad) रंगते.

Transgender Felicitated at Aurangabad
तृतीयपंथी

औरंगाबाद : तृतीयपंथी म्हणलं की - त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. एक माणूस म्हणून समाज त्यांच्याकडे पाहत नाही. मात्र खुलताबाद येथील उरुसमध्ये त्यांना विशेष महत्त्व दिलं (Transgender Felicitated at Aurangabad) जातं. दहा ते पंधरा दिवस त्यांच्या राहण्याची विशेष सोय केली जाते. प्रत्येक रात्री त्यांच्या कव्वालीची मैफिल देखील (Transgender sings qawwali in Urus of Khultabad) रंगते.

प्रतिक्रिया देताना तृतीयपंथी सुहाना सीमा शेख व हीना सीमा शेख

तृतीय पंथीयांना मान - खुलताबाद येथे हजरत ख्वाजा मुंतजीबोद्दिन जर जरी बक्ष यांच्या 836 व्या उरसाला उत्साहात सुरुवात झाली. प्रत्येक वर्षी उत्साहात साजरा होणाऱ्या उरुसमध्ये वेगवेगळ्या बाबी पाहायला मिळतात. त्यात आकर्षणाची गोष्ट म्हणजे तृतीयपंथी. उरुस सुरू झाल्यावर महाराष्ट्रासह देशातून तृतीयपंथी खुलताबाद Urus of Khultabad येथे दाखल होतात. यावर्षी देखील मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने तृतीयपंथी समाजाचे लोक दर्ग्यामध्ये दाखल झाले आहेत. पहिल्या दिवशी दर्गा व्यवस्थापनाकडून मानाची चुनरी म्हणजेच ओढणी देऊन त्यांचे स्वागत आणि सत्कार केला जातो. दरवर्षी दर्गा परिसरात येणारा प्रत्येक भाविक मान - सन्मान मिळत असल्याची माहिती सुहाना सीमा शेख यांनी (Transgender sings qawwali) दिली.

दर्ग्यात गटात कव्वाली - खुलताबाद येथील दर्ग्यामध्ये तृतीयपंथी दहा ते बारा दिवस मुक्कामी असतात. गेल्या अनेक विड्यांची ही परंपरा असते. पहिल्या दिवसापासून रोज रात्री तृतीयपंथी समाजातर्फे कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ढोलकीच्या आणि घुंगरांच्या आवाजात भक्तीपर गीतांचा सादरीकरण केलं जातं. मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव, या कव्वालीला दाद देत असतात. त्यावेळी अनेक जण त्यांना बक्षीस म्हणून पैसे देखील देतात. शेवटच्या दिवशी याच पैशांचा लंगर म्हणजेच भंडारा समाजातर्फे घालण्यात येतो. अशी माहिती उपस्थित तृतीयपंथी हिमा सीमा शेख यांनी (Transgender Felicitated) दिली.

सुविधा मिळत नसल्याने दुःख - खुलताबाद येथील उरूसमध्ये तृतीयपंथीयांना सन्मान दिला जातो. मात्र वास्तव जीवनामध्ये आम्हाला वेगळ्याच नजरेने पाहिलं जातं. त्यामुळे आम्हालाही सन्मानपूर्वक दृष्टिकोनातून पाहिला हवं, अशी खंत हिना सीमा शेख यांनी व्यक्त केली. आजही आम्हाला आधार कार्ड आणि राशन कार्ड मिळण्यास अनेक अडचणी येतात. आमच्यातील अनेक जण आता उच्चशिक्षित होत आहेत. असं असलं तरी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही बदलत नाही. रोजगार आम्ही आमच्या हिमतीवर मिळवू, मात्र आमच्यासाठी देखील राहण्याची सोय होण्याकरिता घरकुल द्यायला हवं. इतकंच नाही तर, मृत्यू झाल्यानंतर आम्हाला दफन करण्यासाठी सोय करण्यात यावी, अशी मागणी सुहाना सीमा शेख यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.