औरंगाबाद - कोरोनामुळे देशातील पर्यटनस्थळ बंद ठेवण्यात आली होती. त्यात सोमवारपासून ताजमहल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्रात अद्याप पर्यटनस्थळ कधी सुरू होतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे पर्यटनव्यवसायाशी संबंधित व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. मागील सहा महिन्यांत पर्यटनाची राजधानी असणाऱ्या औरंगाबादच्या व्यासायिकांचे चारशे कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांप्रती काँग्रेसचे प्रेम बेगडी तर, शिवसेना संभ्रमित, देवेंद्र फडणवीस यांची टीका
औरंगाबाद पर्यटन राजधानी म्हणून जगप्रसिद्ध आहे. वेरूळ, अजिंठा, बीबीचा मकबरा, दौलताबादचा देवगिरी किल्ला अशी पर्यटनस्थळ पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक दरवषी शहरात दाखल होतात. त्यावेळी या पर्यटनस्थळांची माहिती देणारा महत्वाचा घटक म्हणजे गाईड. जिल्ह्यात मान्यताप्राप्त 47 तर राज्यात 167 गाईड म्हणजेच पर्यटक मार्गदर्शक आहेत. कुठलेही प्रमाणपत्र नसलेले, मात्र पर्यटकांना स्थळांची माहिती सांगणारे असे 3500 गाईड राज्यात आहेत. दरवर्षी साधारणतः चार ते साडेचार लाखांच्या जवळपास उत्पन्न गाईड यांना मिळते. मात्र कोरोनाच्या या महामारीमुळे सहा महिन्यांपासून उत्पन्न शून्य झाले आहे.
हेही वाचा - चंद्रकांत पाटलांनी कंगना रणौतला दिला 'हा' सल्ला...
कोरोनाच संकट असल्याने खबरदारीचे उपाय म्हणून पर्यटनस्थळ बंद ठेवण्यात आले आहेत. ही चांगली गोष्ट असली तरी पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या गाईड आणि इतर व्यवसायिकांवर वाईट परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे ताजमहालाप्रमाणे अटी आणि शर्तींच्या आधीन राहून पर्यटनस्थळे सुरू करावी, अशी माहिती टुरिस्ट गाईड फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी सदस्य तेजेंद्रसिंग गुलाठी यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद पर्यटनाची राजधानी असल्याने वेगवेगळ्या मोठ्या शहरांसाठी येथून थेट विमान उड्डाण व्हावीत, अशी मागणी केली होती त्यात यश आले होते. अनेक ठिकाणची विमान उड्डाण सुरू करण्यात आली आली होती. मात्र, कोरोनामुळे सर्व उड्डाण बंद करण्यात आली आहेत. आता ही उड्डाणे पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावी लागतील. त्यानंतर पर्यटन सुरळीत होऊ शकेल. मात्र, यासाठी मोठा कालावधी लागेल, असे मत देखील औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - अजित पवारांनीच केला शरद पवारांचा गेम - निलेश राणे