औरंगाबाद - जिल्ह्यात गुरुवारी सकाळी 54 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 1173 झाली आहे. त्यामुळे चिंता वाढल्याचे दिसून येत आहे.
सकाळी आलेल्या अहवालात औरंगाबाद शहरातील गरम पाणी (1), शिवराज कॉलनी (1), कैलास नगर (1), सौदा कॉलनी (1), रेहमानिया कॉलनी (२), आझम कॉलनी, रोशन गेट (2), सिटी चौक (6), मकसूद कॉलनी (1), हडको एन-12 (1), जयभीम नगर (11), हुसेन कॉलनी, गल्ली नं.9 (1), खडकेश्वर (1), न्याय नगर, गल्ली न.18 (2), हर्सुल कारागृह (1), खिवंसरा पार्क,उल्कानगरी (2), टाइम्स कॉलनी, कटकट गेट (2), मुकुंदवाडी (5), आदर्श कॉलनी (1), काबरा नगर (1), उस्मानपुरा (3), हुसेन कॉलनी, गल्ली नं.10 (4) आणि पडेगाव येथील मीरा नगर (4) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 28 महिला व 26 पुरुषांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सतत वाढत चाललेल्या रुग्णांमुळे प्रशासनासमोरील चिंता वाढत चालली आहे. एकीकडे रोज जवळपास 50 हुन अधिक रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. तर दुसरीकडे मृतांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बाधित झालेल्या रुग्णांवर आरोग्य यंत्रणेने यशस्वी उपचार केल्यानंतर बुधवारी दिवसभरात शहराच्या विविध भागातील 50 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) एक, जिल्हा सामान्य रूग्णालय 16, मनपा कोविड केअर सेंटरमधून 25 आणि दोन खासगी रुग्णालयातून आठ यांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 451 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.