औरंगाबाद - जिल्ह्यात बुधवारी 41 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता 1117 झाली आहे. आतापर्यंत 401 रुग्णांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे. तर मृतांची संख्या 36 वर पोहचली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये गणेश नगर, खंडोबा मंदिर, सातारा गाव (1), न्याय नगर, गल्ली नं. 7 (2), पुंडलिक नगर, गल्ली नं 7 (1), पोलीस कॉलनी (2), लिमयेवाडी, मित्र नगर (1), शरीफ कॉलनी (1), न्याय नगर, गल्ली न.1 (1), रोहिदास नगर, मुकुंदवाडी (3), मराठा गल्ली, उस्मानपुरा (2), कैलास नगर, गल्ली नं.2 (3), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं.5(2), शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक, बालाजी नगर (2), इंदिरा नगर (1), खडकेश्वर (1), माणिक नगर (1), जयभीम नगर (4), पुंडलिक नगर (5), जिल्हा सामान्य रुग्णालय (1), संजय नगर (1), सिटी चौक (1), बालाजी नगर (1), आझम कॉलनी (1) आणि फुलंब्री तालुक्यातील बाबरा, भिवसने वस्ती (2), कन्नड तालुक्यातील धनगरवाडी, औराळा (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 16 महिला व 25 पुरुषांचा समावेश आहे.
मंगळवारी दुपारनंतर घाटीतून तीन कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्यामध्ये संजय नगरातील दोन महिला (वय 68, 60) व बायजीपुरा गल्ली क्रमांक एकमधील 65 वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे. सध्या घाटी रुग्णालयात 78 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 71 जणांची स्थिती सामान्य तर सात जणांची स्थिती गंभीर आहे. आतापर्यंत 401 रुग्णांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. तर दुसरीकडे हिमायत बाग येथील 65 वर्षीय पुरूष रुग्णाचा 19 मे रोजी मध्यरात्री 12.20 वाजता मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार होते तर हर्सूल येथील 63 वर्षीय पुरुष या कोरोनाबाधित रुग्णांचा सकाळी दहा वाजता घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारही होते. आजपर्यंत घाटीमध्ये 33, जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) एक आणि खासगी रुग्णालयात दोन अशा एकूण 36 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.