ETV Bharat / city

Airports Renamed Proposal : देशातील 13 विमानतळांचा लवकरच नामविस्तार डॉ. भागवत कराड - Airports Renamed Proposal In Maharashtra

देशातील तेरा विमानतळाच्या नामांतराचे प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे आले आहेत. राज्यातील कोल्हापूर, औरंगाबाद आणि शिर्डी या विमानतळाचा देखील प्रस्ताव यामध्ये आहे. अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
author img

By

Published : Feb 18, 2022, 11:13 AM IST

औरंगाबाद - औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजीमहाराज यांचे नाव द्यावे अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यावर केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी विमानतळाची अशी अधिसूचना आधीच काढण्यात आली आहे. (Airports Renamed Proposal In Maharashtra) देशातील सर्वच विमानतळाचे प्रस्ताव आहेत आणि ते एकत्रितच होतील. अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

पत्रकारांशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

सेना-भाजपात नामकरणावरून रस्सीखेच

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून, औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारला पाठवावा. (Airports Renamed Proposal Dr. Bhagwat Karad) आम्ही त्यावर तातडीने निर्णय घेऊ, एवढेच नव्हे तर लवकरच औरंगाबाद शहरातील चिकलठाणा विमानतळाचेही नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करू अस केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भगवत कराड यांनी सांगितले आहे.

राज्यातील तीन विमानतळांचे नामकरणाचे प्रस्ताव

औरंगाबादच्या चिखलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे असा प्रस्ताव आलेला आहे. तर कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने पंतप्रधान कार्यालयाला पाठवला आहे. औरंगाबाद, कोल्हापूर आणि शिर्डी असे एकूण तीन विमानतळ तीन विमानतळ नामकरणाचे प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे प्राप्त आले आहेत. आणखी कोणत्या विमानतळाचे नाव बदलाचे प्रस्ताव आहेत, याबाबत विचारना करण्यात आली.

एकूण देशातील तेरा ठिकाणचे प्रस्ताव

एकूण देशातील तेरा ठिकाणचे प्रस्ताव आले आहेत. त्याचे सर्वेक्षण सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रस्तावांना पंतप्रधान कार्यालयातून मंजुरी मिळाल्यानंतर, हे प्रस्ताव केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामार्फत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येतील. (Airports Renamed Proposal News) त्यानंतर नामकरणावर शिक्कामोर्तब होईल. ही प्रक्रिया लवकरच मार्गी लागेल असही केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.

औरंगाबाद विमानतळाचा विस्तार लवकरच

औरंगाबाद विमानतळाचा विस्तार लवकरच होणार आहे. यासाठी इमिग्रेशन सेंटर सुरू करण्याच्या हालचालींनाही वेग आला आहे. दरम्यान, लवकरच ते सुरू होईल. इतकेच नाही तर औरंगाबाद विमानतळामध्ये विमान पार्किंगची व्यवस्था आहे. रात्री विमान इथे थांबेल. दरम्यान, दोन विमान रात्री इथे मुक्कामी असतील आणि सकाळी वेगळ्या ठिकाणी येथून थेट उड्डाण करणे शक्य होईल. विमानाला लागलेला पेट्रोल देखील स्वस्त मिळेल. त्यामुळे त्याचा फायदा होईल. लवकरच अनेक बाबींची घोषणा केल्या जातील असही कराड यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा - Kirit Somaiya-Sanjay Raut : भाजप नेते किरीट सोमैया कोर्लई गावाच्या दिशेने रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.