ETV Bharat / city

'राम मंदिर निर्माणासाठी गावागावातून जमा होणार निधी'

राज्यात एक कोटी 40 तर राज्यातून एक कोटी नागरिकांकडून ही देणगी प्राथमिक स्वरूपात जमा केली जाणार आहे, अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली.

Govinddev
Govinddev
author img

By

Published : Dec 26, 2020, 8:44 PM IST

Updated : Dec 26, 2020, 9:21 PM IST

औरंगाबाद - अयोध्या राम मंदिर निर्माण कार्य सुरू झाला असून मंदिर निर्मितीसाठी आता घरोघरी जाऊन देणगी घेतली जाणार आहे. 15 जानेवारीपासून 27 फेब्रुवारीपर्यंत ही देणगी जमा करण्यात येणार आहे. प्रत्येक गावपातळीवर समिती तयार केली असून यामध्ये लाखो सदस्य मदत कार्य करणार आहेत. राज्यात एक कोटी 40 तर राज्यातून एक कोटी नागरिकांकडून ही देणगी प्राथमिक स्वरूपात जमा केली जाणार आहे, अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली.

देशातून 11 कोटी कुटुंबांशी संपर्क

श्री राममंदिर जन्मभूमी विकासासाठी देशभर संपर्क अभियान राबवले जाणार आहे. देशातील चार लाख गावांमधील 11 कोटी कुटुंबापर्यंत रामभक्त संपर्क करतील. यांमध्ये सर्व पंथ, सर्व संप्रदाय, जाती, क्षेत्र, भाषा अशा सर्व देशवासीयांशी संपर्क करून त्यांचा खारीचा वाटा श्री राम मंदिर निर्माण कार्यात घेण्याचा विचार घेण्यात आला आहे. यामध्ये केवळ निधीच नाही तर राम भक्तांनी वेळही द्यावा, असे आवाहन करण्यात आल आहे. राम मंदिराला किती निधी लागेल हे माहिती नाही मात्र प्रभू श्रीराम स्वतः जितका निधी मिळवून देतील, तितक्या पैशांचा निधी या मंदिरकार्यात वापरला जाईल, अशी माहिती गोविंद देव गिरी महाराज यांनी दिली.

राज्यात होणार जनजागृती अभियान

श्री राम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी 14 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाच्या आधी तयारीसाठी मराठवाडा आणि खानदेशात सात ठिकाणी धर्माचार्य संमेलन आयोजित केले जाणार आहे. 3 जानेवारी ते 11 जानेवारीदरम्यान विविध भागात संमेलन होणार आहेत. या संमेलनामध्ये त्या त्या भागातील धर्माचार्य सहभागी होतील. अभियान काळात धर्मचार्यांच्या उपस्थितीत कोरोनाकाळातील संख्येची मर्यादा पाळून शंभर ते दीडशे लोकांचे सुमारे दहा हजार मेळावे घेण्यात येतील. या मेळाव्यात भजन-कीर्तन आणि प्रसाद वाटप असे स्वरूप असेल. यामध्ये राम मंदिर उभारणीसाठी विशेष मोहिमेअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

मंदिरात काही झाले बदल

श्री राम मंदिर निर्माण यासाठी काही बदल हे करण्यात आलेले आहेत. दोनशे फूट खाली खोदकाम केले तरीही खडक लागला नाही. त्यामुळे पाया कसा करायचा, याची चिंताही होती. मात्र मुंबई, दिल्ली, चेन्नई, गुवाहाटी येथील आयटी तसेच सीबीआरआय रूरकी व एल अँड टी व टाटा इंजिनिअर सर्व्हिसेस येथील तंत्रज्ञ मंदिराच्या मजबूत पायासाठी विचार करत असून लवकरच त्याचे स्वरूप अंतिम होईल. मंदिराची लांबी 360 फूट व रुंदी २३५ फूट असणार आहे. प्रत्येक मजला वीस फूट उंच असणार आहे. देशातील नव्या पिढीला श्रीराम जन्मभूमी मंदिराचा इतिहास माहिती व्हावा, यासाठी अभियानात घरोघरी जाऊन मंदिराचा इतिहास सांगितला जाणार आहे. मंदिर निर्माणासाठी स्टील आणि सिमेंट न वापरता निर्माण कार्य कसे करता येईल, यावरही विचार होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

'उद्धव ठाकरे यांना येण्यास बंदी नाही'

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येण्यास काही लोकांनी मनाई केली. मात्र साधुसंत अशा प्रकारची कुठलीच मनाई उद्धव ठाकरे यांना केलेली नाही. राम भक्त कोणत्याही वेळी प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी येऊ शकतात. कुठल्याही प्रकारची आडकाठी भक्तांसाठी नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकार्य आम्हाला नेहमीच राहिले आहे. त्यामुळे त्यांचा आदर आम्ही सदैव करतो. प्रभुरामचंद्रांचा मंदिरनिर्माण कार्यात शिवसेनेसारखे पक्ष जर निधी जमा करण्यासाठी समोर आले, तर निश्चितच त्यांचे स्वागत असेल. त्यांनी केलेली मदत आम्ही निश्चित घेऊ, असे ते म्हणाले.

Last Updated : Dec 26, 2020, 9:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.