औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी संशोधनाला सुरुवात केली. जगभर कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. लसीकरणासोबतच औषधे व अन्य उपचार पडताळण्यात येत आहेत. अशातच औरंगाबादच्या एका विद्यार्थ्याने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खास रोबोट तयार केलाय. हा रोबोट कोरोनाबाधित रुग्णांना औषधे आणि जेवण पोहोचवण्याचे काम करणार आहे. यामुळे कोरोनाबाधितांच्या सान्निध्यात येणाऱ्या व्यक्तींचा वावर कमी करता येणार आहे. तसेच नर्सेस आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या जीवाचा धोका कमी होणार आहे.
मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा विरोध करण्यासाठी तरुणाईने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यानंतर युवकांनी काहीतरी करावं असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला साई रंगदाळ या लहान मुलाने प्रतिसाद दिला. आणि घरातील काही जुने इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि साहित्य वापरून त्याने हा रोबोट तयार केला. हा रोबोट मोबाईलवर ऑपरेट करता येत असून शंभर मीटरच्या अंतरात त्याचा वापर करता येतो.
सातवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या साई सुरेश रंगदाळ या विद्यार्थ्याने कोरोनाच्या रुग्णांना देवा देणारा हा रोबोट तयार केला आहे. या रोबोटला त्याने ‘शौर्य १.००’ अस नाव दिल आहे. कोरोनाचा थैमान सर्वत्र सुरू असून रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्यानां हा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना रक्षण देण्यासाठी आणि रुग्णांना उपचार देण्यास मदत व्हावी याकरिता हा रोबोट तयार केल्याचं साईने सांगितलं. हा रोबोट ब्लू टूथ च्या माध्यमातून ऑपरेट होतो. मोबाईल रिमोट द्वारे या रोबोटला कमांड देता येतात. ‘एच सी ०५ ब्ल्यू टूथ’ हे मॉड्यूल वापरले. दोन ‘एल २९८ एन मोटार ड्रायव्हर’ वापरले आहेत.
या रोबोटला चाकेही बसविण्यात आली असून, १८६५० ही रिर्चाजेंबल बॅटरी बसविली आहे. ही सर्व यंत्रणेला कमांड देण्यासाठी प्रोग्रामिक ‘ऑर्डिनो आयडीई सॉफ्टवेअर’ची वापरण्यात आली आहे. रोबोटची सामान वाहून नेण्याची क्षमता जवळपास 1 किलो इतकी आहे. जवळपास चार हे पाच दिवस या रोबोटच्या निर्मितीसाठी लागले आहेत. या रोबोटमुळे रुग्णालयात कोरोना रुग्णांना सेवा देने सोपे होईल असा अंदाज साई रंगदाळ याने सांगितले. साईला घरातील सर्वचजण होईल तशी मदत करतात.
साईला लहानपणापासून रोबोट, गॅजेट तयार करण्याची आवड असल्याचे त्याच्या आईने सांगितले. शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर त्याला एक गॅजेट तयार करायचे होते. मात्र लॉकडाऊनमुळे दुकानं बंद झाली;आणि रोबोसाठी लागणाऱ्या वस्तू त्याला घेता आल्या नाहीत. त्यामुळे घरातील काही जुन्या गॅजेटचे साहित्य वापरून त्याने हा रोबोट तयार केला. यापूर्वीही त्याने मोबाईद्वारे घराचे दार उघडणे, लॉक लावणे, मोटारीवर चालणारा आकाश कंदिल तयार केले होते. यातून त्याची नाविन्यपूर्ण वस्तू तयार करण्याची रूची वाढत असल्याचे मत, आई माधुरी रंगदाळ यांनी व्यक्त केले.