ETV Bharat / city

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीची शापित कहानी, 'यामुळे' जगभर प्रसाराला झाला विलंब

author img

By

Published : Jun 22, 2021, 8:14 AM IST

Updated : Jun 22, 2021, 8:41 AM IST

अजिंठा लेणीच सौंदर्य सर्वांना मोहित करणारे आहे. मात्र मोहिनी घालणारी ही कलाकृती एकेकाळी शापित असल्याची आख्यायिका आहे. २८ एप्रिल १८१९ रोजी अजिंठा लेणीचा शोध लागला. त्यानंतर अजिंठा लेणीच सौंदर्य जगासमोर येऊ लागले. त्यावेळी जेम्स बर्जन आणि जेम्स फर्गसन या दोन अधिकाऱ्यांनी त्यावेळच्या सरकारला विनंती करून लेण्यांचा इतिहास सर्वत्र पोहचवण्याचा प्रयत्न करावे, अशी मागणी केली. त्यावर त्याचे काही चित्र काढण्याचे ठरवण्यात आले. रॉबर्ट गिल यांनी १८४३ ते १८७१ पर्यंत शंभरहून अधिक चित्र काढली. काढलेली चित्र त्यांनी नंतर इंग्लंडला पाठवली आणि कोस्टल पॅलेस येथे चित्रांचं प्रदर्शन लावण्यात आले. पहिल्यांदाच अजिंठा लेणी सातासमुद्रापार गेली होती, त्यामुळे तिला पाहण्यास लोकं येऊ लागलीत. मात्र अचानक प्रदर्शनात आग लागली आणि सर्व चित्र नष्ट झाली. पाहुयात हा खास रिपोर्ट..

special-story-about-ajintha-caves-aurangabad

औरंगाबाद - अजिंठा लेणीच जगातील काही आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे. मात्र जगप्रसिद्ध असलेली ही लेणी एकेकाळी शापित लेणी म्हणाली जायची. तो अशा शाप होता कि जवळपास सव्वाशे वर्ष या लेणीच काढलेले कुठलेही चित्र अथवा छायाचित्र जगासमोर जाऊ शकले नाहीत. काढलेली चित्रे आपोआप नष्ट झाली. एका मागे एक अनेक घटना ज्यामध्ये लेण्यांचे चित्र काढलेले छायाचित्र नष्ट झाल्याने या लेण्यांवर कुठलातरी शाप असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे १९५० च्या आधी लेण्यांचे चित्र किंवा छायाचित्र काढण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे १९५० पर्यंत या लेण्यांचे चित्र जगासमोर सहजासहजी गेले नाही.

एका पाठोपाठ चित्र नष्ट झाले..

अजिंठा लेणीच सौंदर्य सर्वांना मोहित करणारे आहे. मात्र मोहिनी घालणारी ही कलाकृती एकेकाळी शापित असल्याची आख्यायिका आहे. २८ एप्रिल १८१९ रोजी अजिंठा लेणीचा शोध लागला. त्यानंतर अजिंठा लेणीच सौंदर्य जगासमोर येऊ लागले. त्याचबरोबर लेण्यांचा सौंदर्य जगासमोर जावे, यासाठी काही प्रयोग देखील या काळात करण्यात आले. त्यावेळी जेम्स बर्जन आणि जेम्स फर्गसन या दोन अधिकाऱ्यांनी त्यावेळच्या सरकारला विनंती करून लेण्यांचा इतिहास सर्वत्र पोहचवण्याचा प्रयत्न करावे, अशी मागणी केली. त्यावर त्याचे काही चित्र काढण्याचे ठरवण्यात आले. त्यावेळचे अधिकारी रॉबर्ट गिल यांना ते काम देण्यात आले. रॉबर्ट गिल यांनी १८४३ ते १८७१ पर्यंत शंभरहून अधिक चित्र काढली. काढलेली चित्र त्यांनी नंतर इंग्लंडला पाठवली आणि कोस्टल पॅलेस येथे चित्रांचं प्रदर्शन लावण्यात आले. पहिल्यांदाच अजिंठा लेणी सातासमुद्रापार गेली होती, त्यामुळे तिला पाहण्यास लोकं येऊ लागलीत. मात्र अचानक प्रदर्शनात आग लागली आणि सर्व चित्र नष्ट झाली. अवघी पाच ते सहा चित्र चांगली राहिली. त्या नंतर जॉन ग्रिफीक्स नावाच्या प्राध्यापकाने आपल्या विद्यार्थ्यांसह जाऊन पुन्हा चित्र काढली. १८७५ ते १८८५ अशी दहावर्ष त्यांनी अनेक चित्रे काढली. त्या चित्रांचं प्रदर्शन व्हिक्टोरियन अलबर्ट म्युसिअम येथे लावले. मात्र ती चित्रे पुन्हा जळाली. जॉन ग्रिफीक्स सोबत विद्यार्थ्यांनी पुन्हा काही चित्रे काढली आणि नंतर १८९९ मध्ये त्यांचं एक पुस्तक देखील प्रकाशित केली, अशी माहिती इतिहासतज्ञ दुलारी कुरेशी यांनी दिली.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीची शापित कहानी..

शापित लेणी अशी झाली ओळख..

कालांतराने कॅमऱ्याने छायाचित्र काढली जाऊ लागली. काही फ्रेंच लोंकानी अजिंठा लेणीचे छायाचित्र काढले. फ्रान्सला ज्यावेळी पार्ट जात होते. त्यावेळी सूर्याच्या उष्णेतेमुळे कॅमऱ्यातील निगेटिव्ह मधून आपोआप काढलेले छायाचित्र नष्ट झाली. त्यानंतर जपानी कलाकारांनी लेण्यांमधील चित्रांवर पेपर ठेवून लाईन ड्रॉईंग काढली. अतिशय सुंदर असलेली हि लाईन ड्रॉईंग फ्रांस येथे झालेल्या भूकंपात नष्ट झाली. एकापाठोपाठ झालेल्या घटनांमुळे लेणींवर काहीतरी शाप असल्याचे बोलले जाऊ लागले. भारताबाहेर चित्र किंवा छायाचित्र गेल्यास ते नष्ट होत अशी चर्चा सुरू झाल्याने लेण्यांचे चित्र काढण्यास बंदी घालण्यात आली होती. अशी माहिती इतिहासतज्ञ दुलारी कुरेशी यांनी दिली.

१९५० नंतर लेणीचे चित्र आले जगासमोर..

जवळपास १९५० पर्यंत अजिंठा लेणींची छायाचित्र काढण्यात आली नाहीत. मात्र नंतर कलाकारांनी छोट्या प्रमाणात चित्र काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर कुठलीही दुर्घटना घडली नाही. त्यापुढे अजिंठा लेणीचे चित्र भारताबाहेर जाण्यास सुरू झाली. आणि जगाच्या पाठीवर अजिंठा लेण्यांचा प्रचार सुरू झाला. मात्र लेण्यांना त्याकाळी काहीतरी शाप होता या आख्यायिका आजही अनेकांना न पटणाऱ्या असल्या तरी त्याकाळी या घटनांमुळे अजिंठा लेणीचा प्रसार सातासमुद्रापार जाण्यास विलंब झाला हे नक्की.

Last Updated : Jun 22, 2021, 8:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.