ETV Bharat / city

सायकलपटू सोनम शर्माचा विक्रम, एकाच वर्षात दोनदा पूर्ण केली 'सुपर रँडोनियर्स' स्पर्धा

शहरातील सोनम शर्मा या युवतीने एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. सायकलपटूंसाठी खडतर असणारी सुपर रँडोनियर्स ही स्पर्धा एकाच वर्षात दोनदा यशस्वीरीत्या पूर्ण करणारी मराठवाड्यातील पहिली महिला सायकलपटूचा सन्मान सोनमला मिळाला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Oct 12, 2021, 6:52 AM IST

औरंगाबाद - शहरातील सोनम शर्मा या युवतीने एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. सायकलपटूंसाठी खडतर असणारी सुपर रँडोनियर्स ही स्पर्धा एकाच वर्षात दोनदा यशस्वीरीत्या पूर्ण करणारी मराठवाड्यातील पहिली महिला सायकलपटूचा सन्मान सोनमला मिळाला आहे.

बातचित करताना प्रतिनिधी

काय आहे सुपर रँडोनियर्स स्पर्धा

फ्रान्समधील ऍडॉक्स क्लब पॅरिसीयन नन्ही संस्था सायकल पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुपर रँडोनियर्स ही स्पर्धा घेते. त्याचे आयोजन औरंगाबादमध्येही करण्यात येते. या स्पर्धेच्या नियमानुसार विशिष्ट वेळेत दिलेले अंतर पूर्ण करणे गरजेचे असते. या स्पर्धेत एकाच वर्षात चार टप्पे पूर्ण करणे बंधनकारक असते. ज्यामध्ये 200, 300, 400 आणि 600 किलोमीटर अंतराचे ही चार टप्पे असतात. सुपर रँडोनियर्स ही स्पर्धा ऑक्टोबर ते ऑक्टोबर या एक वर्षाच्या काळात राबवली जाते. या स्पर्धेचे विशिष्ट नियम असतात. त्यानुसार ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्याला "सुपर रँडोनियर्स" हा किताब देण्यात येतो. सायकलपटू सोनम शर्माने एकाच वर्षात दोनदा ही स्पर्धा पूर्ण करून वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे.

असा घेता येतो सहभाग

रँडोनियर्स ही स्पर्धा एकट्याने लांब पल्ल्याचा अंतर सायकलिंग करून पूर्ण करावी लागते. या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी बीआरएमच्या ॲपवर नोंदणी करून सायकलपटू नोंदणी करू शकतात. या स्पर्धेत सहभागी होताना कोणासोबतही स्पर्धा न करता स्वतः कोणाची मदत न घेता ही स्पर्धा पूर्ण करावी लागते. यासाठी शारीरिक आणि मानसिक शक्ती पणाला लागते. सलग सायकल चालवताना थकवा येणे, झोप येणे, असे त्रास शरीरात जाणवत असतात. मात्र, याच्यावर मान मात करून ही स्पर्धा पूर्ण करावी लागत असते. स्पर्धा पूर्ण करण्याची आयोजक मार्ग देतात. त्या मार्गावर प्रत्येक पन्नास किलोमीटरवर चेक पॉईंट असतो, तिथे सायकलपटूची नोंद घेतली जाते. दिलेल्या वेळेत निवडलेला टप्पा पूर्ण करणे गरजेचे असते.

अशी केली स्पर्धेची तयारी

सोनम शर्माने यासाठी रोज दोन ते तीन तास सायकल चालवण्याचा सराव केला. औरंगाबाद जिल्हा सायकल असोसिएशनच्या माध्यमातून इतर सदस्यांना घेऊन रोज 50 किलोमीटरचा पल्ला त्यांनी गाठला. सुटीच्या दिवशी शंभर किलोमीटरपर्यंत सायकल चालवण्याचा उपक्रम त्यांनी इतर सदस्यांसोबत राबवला. रोज सुरू असलेल्या या सरावातून सायकल चालविण्याचा आत्मविश्वास सोनामला आला आणि त्यातूनच त्यांनी अवघड मानली जाणारी ही स्पर्धा पूर्ण केली. एकदा नाही तर दोनदा ही स्पर्धा त्यांनी पूर्ण केली. त्यामुळे सोनमवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.

हेही वाचा - Maharashtra band : औरंगाबादेत बंदला संमिश्र प्रतिसाद, व्यापाऱ्यांनी दाखवली केराची टोपली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.