ETV Bharat / city

Python Snake : दुर्मिळ होत चाललेल्या अजगर सापाला सर्पमित्रांनी दिले जीवदान…! - python took shelter in grass

औरंगाबादच्या बिलोनी गावात आढळला अजगर ( Python Snake ). दुर्मिळ होत चाललेल्या अजगर सापाला सर्पमित्रांनी दिले जीवदान ( Snake friends gave life to the snake ). साप कोणताही असो सापाचे नाव काढताच अंगावर काटा उभा राहतो, त्यात अजगर साप दिसताच पाहणाऱ्याची तर बोबडीच वळते. अजगराने झोपडी पासून जवळच असलेल्या गवतात आश्रय घेतला लाकडे, गवत , काटे अशी बिकट परिस्थिती आणि त्यात अंधार पडायला सुरुवात झाल्याने 7 फूट लांब असलेल्या अजगराला ताब्यात घेण्यात अडचणी येत होत्या.

Python Snake
अजगर साप
author img

By

Published : Sep 11, 2022, 12:26 PM IST

औरंगाबाद : साप कोणताही असो सापाचे नाव काढताच अंगावर काटा उभा राहतो, त्यात अजगर साप ( Python Snake ) दिसताच पाहणाऱ्याची तर बोबडीच वळते. दोन दिवसापूर्वी संध्याकाळी वैजापूर तालुक्यातील बिलोणी गावचे शेतकरी पुरुषोत्तम बाबुराव प्रधान ( गट न.126 ) हे आपल्या शेतात काम करून त्यांच्या शेतावरील झोपडीजवळ आले तर त्यांना तिथे एक मोठा साप आढळून आला. सापाला पाहताच तिथून भीतीपोटी बाजूला झाले थोड्या वेळानंतर त्यांनी परिसरातील जरुळ गावचे सर्पमित्र निखिल मतसागर यांना दूरध्वनीवरून सापा विषयी माहिती दिली.

सर्पमित्र निखिल मतसागर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांनी बिनविषारी प्रवर्गातील अजगर साप (non-venomous Python Snake ) आहे असे सांगितले. सर्पमित्र निखिल यांनी विरगाव येथील अनुभवी सर्पमित्र नवनाथ नाईक यांनाही दूरध्वनीवरून माहिती दिली. अजगराने झोपडी पासून जवळच असलेल्या गवतात आश्रय घेतला ( python took shelter in grass ) लाकडे, गवत , काटे अशी बिकट परिस्थिती आणि त्यात अंधार पडायला सुरुवात झाल्याने 7 फूट लांब असलेल्या अजगराला ताब्यात घेण्यात अडचणी येत होत्या. मात्र, अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर सर्पमित्र निखिल मतसागर व सर्पमित्र नवनाथ नाईक यांनी अजगराला एका गोणीत पकडून ( Caught python in sack ) ताब्यात घेतले. त्यानंतर तेथील शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. (Snake friends gave life to the snake )

प्रथमच आढळूला अजगर साप : औरंगाबाद च्या वैजापूर तालुक्यात प्रथमच अजगर साप आढळून आला त्यामुळे परिसरात चर्चेचा विषय बनला, वैजापूर वन विभागाच्या कार्यालयात कायदेशीर नोंद करून वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. कवठे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव सामाजिक संस्थेचे सदस्य सर्पमित्र निखिल मतसागर, नवनाथ नाईक, शुभम बागुल, अनिल मतसागर, पक्षीमित्र रामेश्वर थोरात यांनी अजगर सापास नैसर्गिक अधिवासात मुक्त केले

अजगर साप नेमका असतो तरी कसा ? अजगर साप सर्वात लांब साप असून पण तो पूर्णपणे बिनविषारी आहे. हा साप जंगलात, झाडावर तसेच पाणथळ जमीन, खडकाळ जमिनीवरही आढळून येतो. शेतात काम करताना काळजी घ्या. शेत परिसर, माळरान, जंगल हे तर सापांचे घर आहे. त्यामुळे आपल्या शेतात साप आढळल्यास शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, सापांना इजा करू नये , साप शेतकऱ्यांचा मित्र आहे . शेत परिसरातील साप तेथील उंदरांवर नियंत्रण ठेवतात, पर्यायाने शेतीचे नुकसान टाळले जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.