औरंगाबाद - विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती अर्थात बुद्ध पौर्णिमा बुधवारी शहरात लेणी परिसरांमध्ये बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करतात. मात्र, कोरोना आजाराचा संसर्ग वाढत असल्यामुळे प्रशासनाने बुद्ध पौर्णिमा साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनुयायांनी घरीच राहून साध्या पद्धतीने बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.
दरवर्षी लेणी परिसरामध्ये खेळण्या, पुस्तक, खाद्यपदर्थां, साहित्य दुकाने थाटलेली असतात. मात्र, यंदा कोणालाच परवानगी नसल्यामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना घेऊन पंचशील ध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर वंदना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
गरजूंना साहित्य वाटप
शहर आणि जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, यावेळी कार्यक्रम न घेता अनेक ठिकाणी गरजूंना मदत करण्याचा निर्णय अनुयायांनी घेतला होता. अनेक ठिकाणी खीर दान करण्यात आले. तसेच गरजूंना साहित्य वाटप करण्यात आले.
बौद्ध लेणी येथे झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी भदंत नागसेन बोधी थेरो,सहायक पोलीस आयुक्त दीपक गिऱ्हे, हनुमंत भापाकर, पोलीस निरीक्षक नामदेव सानप, पोलीस निरीक्षक पगारे, निवृत्त पोलीस अधीक्षक दौलत मोरे, दिलीप साळवे उपस्थित होते.
हेही वाचा -उजनीच्या पाण्याचा वाद शरद पवारांच्या गोविंदबाग निवासस्थानावर; इंदापूरचे आंदोलक ताब्यात